
कोपरगाव प्रतिनिधी:-
प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन कोपरगाव दिव्यांग सेना व नि:स्वार्थ फाउंडेशन अहमदनगर जिल्हा यांचे वतीने शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेत सहभागी करून घेणे बाबत मा.तहसीलदार श्री योगेश जी चंद्र साहेब यांना निवेदन देऊन सोबतच 26 दिव्यांग बांधवांचे रेशन कार्ड संबंधी कागदपत्र समिट करून देण्यात आले यावेळी मा.तहसीलदार साहेब यांनी तात्काळ आमच्या निवेदनाचे गांभीर्य समजून दिव्यांग बांधवांचे रेशन कार्ड संबंधी कागदपत्र ठेवून घेतले व त्यांचा अंत्योदय योजनेत सहभाग करून घेतो व एकत्रित कुटुंब रेशन मध्ये ज्याचे नाव आहे अशा दिव्यांग बंधू भगिनींचे रेशन कार्ड डिवाइड करून त्यांचा अंत्योदय योजनेत सहभाग करून घेऊ असे आश्वासन यावेळी तहसीलदार साहेबांनी दिले त्यामुळे वरील दोन्ही दिव्यांग सेनेच्या वतीने तहसीलदार साहेबांचे आभार मानण्यात आले यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन कोपरगाव परमेश्वर कराळे जिल्हा संघटक प्रवीण भुजाडे शहराध्यक्ष अनिल वाणी संगीता सोनवणे अर्चना धुमाळ दिव्यांग सरपंच सतीश कानडे मनसे दिव्यांग सेना व नि:स्वार्थ फाऊंडेशनचे अहमदनगर जिल्ह्याचे योगेश गंगवाल संजय गीते आदी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
