साई सृष्टी टेन्ट अँड फार्महाऊस चे उदघाटन आमदार आशुतोष काळे व सुमित कोल्हे यांच्या हस्ते संपन्न…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब गायकवाड यांनी आपल्या शेतीला पूरक असा ऍग्री टुरिझम ही सांगड असणारा साईसृष्टीटेन्टअँडफार्महाऊस हा नवीन व्यवसाय सुरू केला असून याचे उदघाटन आमदार आशुतोष काळे व संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील प्रगतिशील शेतकरी बाबासाहेब गायकवाड यांनी शेतीला जोडधंदा म्हणून ब्राह्मणगाव येथे साईसृष्टी टेन्ट हाऊस आणि फार्म हाऊस या माध्यमातून लोकांना आपल्या परिवारासोबत गावाकडील निसर्गरम्य वातावरणात निवांत वेळ घालवता यावा यासाठी त्यांनी ही संकल्पना राबवली.या ठिकाणी लोकांना फॅमिली पिकनिक, बिर्थडे पार्टी, हुरडा पार्टी, कँडल लाईट डिनर, करता येणार असून याठिकाणी घरगूती चुलीवरील अस्सल मराठमोळ्या जेवण्याची सोय असून राहण्याची उत्तम सोय केली आहे.

या उद्घाटन प्रसंगी आमदार आशुतोष काळे म्हणाले की,
बाबासाहेब गायकवाड यांनी हा अतिशय सुंदर व्यवसाय सुरू केला असून युवकांनी शेतीसोबतच अशा प्रकारच्या व्यवसायांकडे वळले पाहिजे. तसेच आपल्या परिसरातील गरज ओळखून व्यवसाय सुरू केल्यास त्यात नक्कीच यश मिळेल. यावेळी त्यांनी बाबासाहेब यांना त्यांच्या ह्या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे म्हणाले की,
हा नवीन व्यवसाय कौतुकास्पद व प्रेरणादायक असून
उत्कृष्ट संकल्पना नावीन्यपूर्ण नियोजन या जोरावर बाबासाहेब यांनी आपल्या व्यवसायात भरभराट करो हीच सदिच्छा व्यक्त केली आणि आपल्या तालुक्यातील इतरही युवकांनी असंच वेगळ्या विचारांनी काहीतरी नाविन्यपूर्ण व्यवसायात उतरावं ह्याच मनःपूर्वक अपेक्षा सुमित कोल्हे यांनी व्यक्त केली.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव आसने, पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, श्री साईबाबा तपोभूमी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष रोहित पटेल,अनुराग येवले,बाबासाहेब जगताप, रवींद्र पिंपरकर, पांडुरंग सोनवणे, सिद्धांत बागरेचा, ज्ञानेश्वर आसने, शरद हुळेकर, संतोष भुजाडे, अशोक बनकर, गायकवाड कुटुंबीय आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *