
कोपरगाव प्रतिनिधी:- घराचे दरवाजावर दगड टाकुन,दरवाजा तोडुन,घरातील महिलेस जबर मारहाण करुन
तिच्याकडील रोख रुपये,सोने चांदीचे दागिणे व साड्या जबरीने चोरुन नेणाऱ्या टोळीचा कोपरगाव तालुका पोलीसांकडुन पर्दाफास,दोघास अटक.
दिनांक 09/01/2021 रोजी रात्री 1/45 वा.सुमारास. सर्वे नं. 121/3,बोकटे रोड,ओगदी,ता.कोपरगाव येथे तीन अनोळखी चोरट्यांनी घराचे दरवाजावर दगड टाकुन,दरवाजा तोडुन,घरात प्रवेश करुन कमलबाई लक्ष्मण जोरवर वय 45 वर्षे,रा.बोकटे रोड,ओगदी,ता.कोपरगाव यांना जबरी मारहाण करत त्यांच्या डाव्या हातावर,पाटीवर,मांडीवर लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन हात फ्रेंक्चर केला होता. तसेच घरातील रोख रुपये ,सोने चांदीचे दागिणे व साड्या असा एकुण रुपये 3,19,200/- किंमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता. त्यांच्या फिर्यादीवरुन कोपरगांव तालुका पोलीस स्टेशनला दिनांक 09/01/2021 रोजी गुन्हा रजि. नं. 14/2021 कलम 394,397,457,34 भादवि प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वरीष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाने कोपरगाव तालुका पोलीसांनी तपास सुरु केला होता.
दिनांक 11/02/2021 रोजी गुन्ह्यातील संशयीत आरोपी (1) सचिन उर्फ संजय उर्फ बोंग्या सखाहारी
चव्हाण,वय28वर्षे,रा.पढेगाव,ता.कोपरगाव,जि.अहमदनगर (2)सचिन विरुपन भोसले,वय 21 वर्षे,रा.गाजगाव,ता.गंगापुर,जि.औरंगाबाद अशांना अटक केली. सदर आरोपींना मा.न्यायालयाने दिनांक 16/02/2021 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान आरोपींना गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस खाक्या दाखवुन,उलट सुलट प्रश्न विचारुन,विश्वासात घेवुन,विचारपुस केली असता,त्यांनी त्यांचा अजुन एक साथीदार
संकेत मेहंद्या उर्फ महेंद्र चव्हाण,रा.शिर्डी,ता.राहाता (फरार) असे तिघांनी ओगदी येथे एका घराच्या दरवाजावर दगड टाकुन दरवाजा तोडुन,महीलेला मारहाण करन तिचे ताब्यातील रोख रुपये,सोने चांदीचे दागिणे व साड्याबळजबरीने चोरुन नेल्याची कबुली दिली आहे.
दिनांक 13/02/2021 रोजी अटक आरोपी (1) सचिन उर्फ संजय उर्फ बोंग्या सखाहारी चव्हाण,वय 28 वर्षे, रा.पढेगाव,ता.कोपरगाव,जि.अहमदनगर याने जबरीने चोरुन नेलेले सोने व चांदीचे दागिण्या पैकी दिड तोळा सोन्याची लगड व 250 ग्रॅम चांदीची लगड तसेच दिनांक 14/02/2021 रोजी रुपये 1200/-कि.एकुण 05 साड्या असा एकुण रुपये 76,200/- किमातीचा.मुद्देमाल हस्तगत केला आहे. वरील तिन आरोपींनी याच प्रकारचे पोस्टे हद्दीत तसेच
इतरत्र किती गुन्हे केले ? या बाबत तपास चालु आहे.
सदरची कौतुकास्पद कामगीरी मा.पोलीस अधिक्षक मनोज पाटील ,मा.अपर पोलीस अधिक्षक
सौ दिपाली काळे ,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक,दौलत जाधव,पोसई/सचिन इंगळे, पोहेकॉ/ इरफान शेख पोकॉ रमेश झडे,पोकॉ/आंबादास वाघ व पोकॉ/जयदिप गवारे यांनी केली आहे.
