
कोपरगाव प्रतिनिधी
(निंभेरे):-
निंभेरे ता. राहुरी येथील विविध कार्यकारी सोसायटी चे माजी चेअरमन कै. नामदेवराव मुरलीधर ढेपे यांचे प्रथम पुण्यस्मरण दिना निमित्ताने वृक्षारोपण व कोरोनाने छत्र हरपलेल्या मुलांना शालेय साहित्य वाटप करून निंभेरे येथील ढेपे परिवाराने नामदेवरावांच्या आठवणींना उजाळा दिला.
प्रसंगी सुप्रसिद्ध समाज प्रभोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे जाहीर हरीकीर्तन झाले.
या निमित्ताने वृक्षमित्र मेजर शिवाजीराव पालवे, ह भ प मनोहर महाराज सिनारे, एकल महिला पुनर्वसन समितीचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रहार चे आप्पासाहेब ढुस, सचिव प्रशांत कराळे, डॉ विखे पाटील सह साखर कारखानाचे व्हा. चेअरमन विश्वासराव कडू पाटील, मुळा प्रवरा चे माजी संचालक मच्छीन्द्र अंत्रे, मराठा उद्योजक लॉबीचे संपर्क प्रमुख राजेंद्र औताडे, जयहिंद वृक्ष बॅंक चे संचालक अमोल ढेपे, मेजर शिवाजी गर्जे, अनिल ढेपे, सोमनाथ सिनारे, रेपाळे सर अमोल काचोळे, रवी दिघे, आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे हस्ते निंभेरे स्मशानभूमी परिसर व मराठी शाळे शेजारी ५१ वडाची १० फूट उंचीची वृक्ष लागवड करणेत आली.
