
कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील देर्डेको-हाळे येथील उमरावती सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे देवराम विठ्ठलराव गवळी तर उपाध्यक्षपदी साहेबराव काशिनाथ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांचे जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.
श्री.देवराम गवळी यांच्या नावाची सुचना संस्थापक अरुणराव येवले यांनी केली तर त्यास चांगदेवराव कोल्हे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी पुंडलिक गवळी यांनी सूचना आणली तर त्यास देवराम गवळी यांनी अनुमोदन दिले, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एन. राहणे यांनी काम पाहिले. नवनिर्वाचीत अध्यक्ष उपाध्यक्षांचा, इयत्ता दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा, तसेच जिल्हा बँक पातळीवर शंभर टक्के वसुली केल्याबद्दल सचिव अशोक घेर तसेच हिंगणवेढे, शिलेदारवाडी सोसायटी सचिव व बँक अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यांत आला, देर्डे-कोऱ्हाळे गावात वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना अरुणराव येवले म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे तालुक्याचे भाग्यविधाते होते. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी तालुक्याच्या प्रत्येक संकटात मोलाची साथ दिली तर भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी गेल्या पाच वर्षात विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी आणून कामे मार्गी लावली आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनांत आर्थिक क्रांतीचा पाया सहकारी सोसायट्या घालत असतात, तेव्हा प्रत्येक सभासदाने घेतलेले कर्ज नियमीत पेडले पाहिजे. जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांचे सहकार्याने सभासद शेतकऱ्यांच्या असणाऱ्या योजना राबविण्यांसाठी प्रयत्नशिल राहू.
याप्रसंगी सर्वश्री. बाळासाहेब होन, ज्ञानेश्वर देशमुख, विशाल डूबे, पुंडलीक गवळी, सोमनाथ गायकवाड, निवृत्ती विघे, विजया पवार, रेखा कोल्हे, चांगदेव कोल्हे, दिगंबर बैरागी, शैलेश डूबे, राजेश डूबे, भाऊसाहेब डूबे, चांगदेव शिंदे, प्रशांत शिलेदार, संजय शिलेदार, कैलास दवंगे, भाऊसाहेब शिंदे, संदीप डूबे, सुमित चौधरी, वसंत पवार, राजेंद्र पेकळे, राजेंद्र गवळी यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी संचालक पदाधिकारी, भाजपाचे सर्व सेलचे प्रमुख, कार्यकर्ते, देर्डे-कोऱ्हाळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सचिव अशोक घेर यांनी आभार मानले.
