
कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील मोरवीस ग्रामपंचायतीच्या एका रिक्त जागेची निवडणुक बिनविरोध होवुन त्यात कोल्हे गटाच्या सौ. सुनिता एकनाथ माळी यांची निवड झाली आहे. निवडणुक अधिकारी म्हणून श्री. जे. एन. पठाण यांनी काम पाहिले. बिनविरोध निवडुन आलेल्या सौ. सुनिता माळी यांचे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.
याबाबतची माहिती अशी की, मोरवीस ग्रामपंचायतीच्या अनुसुचित जमातीच्या श्रीमती लक्ष्मीबाई बर्डे यांचे निधन झाल्याने त्यांची जागा रिक्त झाली होती. त्याचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला होता त्यात कोल्हे गटाच्या सौ सुनिता एकनाथ माळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला., तर सौ. सुनिता यांचे पती एकनाथ चंद्रभान माळी हे मोरवीस ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच आहेत. त्यामुळे आता ग्रामपंचायतीचा कारभार पती पत्नी पाहतील असा अनोखा योगायोग जुळून आला आहे.
या निवडीसाठी सर्वश्री गोरखनाथ कोकाटे, शरद वाघ, प्रभाकर पारखे, संतोष सरडे, हरि सरडे, नवनाथ कोकाटे, संतोष कोकाटे, संपत कोकाटे, भगवान जाधव, अनिल साबळे आदिंनी विशेष परिश्रम घेतले, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे संचालक सर्वश्री. मनेष गाडे, अशोक भाकरे, विजय साळूंके, माजी उपसभापती वैशाली साळुंके, कैलास माळी, बाजीराव मांजरे, भाउसाहेब भाकरे, सुनिल वाणी, राहुल वाणी, विलास माळी, बाळासाहेब अहिरे चंद्रकांत चांदगुडे, राहुल चांदगुडे, अशोक आहेर, कल्याणराव चांदगुडे, आदिंनी त्यांचे अभिनंदन केले.
