डॉ.शेफाली भुजबळ यांच्या ‘निसर्गायण’ चित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद..!!

Uncategorized

डॉ.शेफाली भुजबळ यांच्या ‘निसर्गायण’ चित्र प्रदर्शनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन…

कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक):- डॉ.शेफाली भुजबळ यांनी रेखाटलेल्या विविध निसर्ग चित्रांचे नाशिक येथील हॉटेल एक्सप्रेस इन ग्रँड्युर हॉल येथे चार दिवसीय ‘निसर्गायण’ हे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनाचे उद्दघाटन आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
नुकतेच मुंबई येथे डॉ.शेफाली भुजबळ यांचे ‘अनावरणम्’ हे चित्रप्रदर्शन पार पडले असून या प्रदर्शनास उत्तम असा प्रतिसाद लाभला. त्यानंतर आता प्रथमच नाशिक शहरात त्यांच्या निसर्गायण या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला आज नाशिक शहर व जिल्ह्यातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.

या प्रदर्शनास माजी मंत्री शोभा बच्छाव,माजी आमदार निर्मला गावित, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, नगरसेविका वत्सला खैरे, डॉ.हेमलता पाटील, माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते, वेदिका होळकर, सोनिया होळकर, योगिता आहेर, ऍड.अश्विनी देशपांडे, आशा भंदुरे, कल्पना पांडे, पूनम कासार, शिवांगी पांडे,डॉ.लतिका शानबाग, सुवर्णा चंदर, डॉ.सुचेता बच्छाव, अश्विनी न्याहारकर, वैशाली गुप्ता, रेखा देवरे,शीतल रुंगठा, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या.

दि.१२ ते १५ मार्च दरम्यान प्रदर्शन सर्वांसाठी खुले
डॉ.शेफाली भुजबळ यांचे निसर्गायण हे चित्रप्रदर्शन दि.१२ ते १५ मार्च २०२२ या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *