
कोपरगांव प्रतिनिधी:-
भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी तालुक्यातील मळेगावथडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संधी दिल्यामुळे वर्षभरात ग्रामपंचायत अंतर्गत २० लाख ६४ हजार ७०० रूपयांची विकासकामे पुर्ण करता आली अशी माहिती सरपंच सौ. अनिता किरण उगले यांनी दिली. त्यांच्या कारकिर्दीस एक वर्षांचा कालावधी पुर्ण झाला असता त्यांनी गांवअंतर्गत विविध विकासकामांचा लेखाजोखा यावेळी सादर केला.
सरपंच सौ. अनिता उगले पुढे म्हणाल्या की, गेल्या वर्षभरात एकलव्य नगर मध्ये गटार (३ लाख १४ हजार ७००), आर ओ शेड दुरुस्ती (१ लाख ५० हजार), जिल्हा परिषद शाळा गावठाण संरक्षक कंपाउंड (२ लाख ५० हजार), गावठाण अंगणवाडी शौचालय ५०च्हजार), निलाववाडी अंगणवाडी शौचालय ५० हजार), निलाववाडी पिण्यांच्या पाण्याचा आर ओ प्लांट (५ लाख), जिल्हा परिषद निधी अंतर्गत गावठाण शाळा (२ लाख) पाण्याची टाकी, आदिवासी वस्तीत हायमास (४ लाख), अशी वर्षभरात एकुण २० लाख ६४ हजार ७०० रूपयांची विकासकामे पुर्ण करण्यात आली, याकामी संजीवनी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सखाहरी उगले, संतोष दवगे, उपसरपंच मुकेश चंद्रे, ग्रामपंचायत सदस्य विजय खोंड, मंदाकिनी राजगुरू, सुमनबाई मोरे, सारिका दवंगे, जयश्री दवंगे, सोमनाथ जाधव, बाबासाहेब रामदास खोंंड, ग्रामविकास अधिकारी श्रीमती नजन यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. मळेगांवथडी ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते, वीज व आरोग्यासह अन्य विकास कामांचे प्रस्ताव दाखल केले असुन ते ही लवकरच मार्गी लागतील असा विश्वास सौ अनिता उगले यांनी व्यक्त केला.
