
कोपरगाव प्रतिनिधी :-
मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने युवासेनाप्रमुख पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शिर्डी लोकसभेतील युवासेनेच्या युवती पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून सचिव वरुण सरदेसाई यांनी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे.कोपरगाव युवतीची निवडही जाहिर झाली असुन यामध्ये जिल्हा युवती अधिकारी : अक्षिता आमले (कोपरगाव- राहाता),उपजिल्हा युवती अधिकारी : स्नेहल कुडके, अनिता वागखिंडे. विधानसभा समन्वयक : आरती कौर, तालुका युवती अधिकारी शीतल चव्हाण, तालुका समन्वयक पूजा शर्मा ,उपतालुका युवती अधिकारी दीपाली वायखिंडे, विधानसभा अधिकारी वृषाली बारावकर,उपतालुका चिटणीस हर्षदा पारधे,शहर युवती अधिकारी अमृता राऊत, कोमल कुडके उपशहर अधिकारी शिवानी पासवान, अदिती बारवकर, प्रीती कोपरे, गौरी येवले, दिव्या भंड, शहर चिटणीस सुकन्या आमले, तन्वी कुवर, गौरी साळुंखे. अशा कोपरगाव येथील युवतिची निवड झाली आहे.या नुतन कार्यकरणीचा शिवसेना उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे विस्तारक सुनिल भैय्या तिवारी, शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल, महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख नगरसेविका सपनाताई मोरे,नगरसेविका वर्षाताई शिंगाडे,उपशहर प्रमुख अश्विनीताई होने,एम.के.आढाव विद्यालय शालेय कमिटीची सदस्य बाळासाहेब सांळुके, शिव वाहतूक सेनेचे इरफान शेख यांच्या प्रमुख उपस्थित सत्कार करण्यात आला आहे.नविन पदाधिकारी यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहे.कोपरगाव तालुक्यातील सर्वसामान्य घरातील तरूणांनी हक्काचे व्यासपीठ युवती सेनेच्या माध्यमातुन मिळाले आहे.शिवसेनेच्या युवती सेनेच्या व्दारे अनेक समस्या प्रश्न सोडविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे.असे प्रतिपादन नगरसेविका सपनाताई मोरे यांनी केले आहे.युवा सेनेचे शिर्डी लोकसभा विस्तारक सुनिल तिवारी म्हणाले की तरुणींना शिवसेनेत जोडण्यासाठी त्यांचे प्रश्न प्रखरतेने मांडण्याचे प्रयत्न युवतीसेनेकडुन केले जाणार आहे.शिवसेनेला बळ देण्यासाठी युवा युवती सेनेची मोठी मदत होणार आहे.पुढे शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल म्हणाले की,युवती सेनेच्या सर्व पदाधिकार्याचे अभिनंदन करत युवती सेनेच्या पदाधिकारी यांनी व्यवस्थित काम करावे जेणे करुन कोपरगावचे नाव महाराष्ट्रभर गाजले पाहिजे.युवती सेनेच्या शैक्षणिक सामाजिक नोकरी विषयक समस्या जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवु.कोणत्याही प्रकारच्या अडी अडचणी आल्यास शिवसेना आपल्या पाठीशी आहे.या सत्कार सोहळ्यास उपशहर प्रमुख भुषण पाटणकर ,गगन हाडा,नितिन राऊत,ग्राहक संरक्षण मंचाचे राहुल देशपांडे, भुषण वडांगळे,विक्रांत खर्डे,वैभव गिते, जाफर पठाण,सतीश खर्डे,ऊमेश छुगाणी,राकेश वाघ,किरण अडागळे, राहुल वायखिंडे,
वैभव देसाई,मंगेश देशमुख,दिनेश भालेराव,अक्षय वाकचौरे, अक्षय वराडे,अक्षय नन्नवरे याच्या सह शिवसेना,युवा सेना, युवती सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाला उपस्थित सर्वाचे आभार बाळासाहेब सांळुके यांनी मानले आहे.
