शालेय जीवनातील संस्कार व छंद विदयार्थीसाठी महत्वाचे:- श्री.केतन कुलकर्णी…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनीधी:-
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत माझी वसुंधरा शपथ ग्रहण व वृक्षारोपन समारंभ आयोजित करण्यात आला.यावेळी
सोनी टी.व्ही वरील इंडीयन आयडाॕल मध्ये प्रवेश मिळवलेल्या कु.सुरभी कुलकर्णीला शुभेच्छा देण्यासाठी तिचे पालक शारदा संगित विदायालयाचे संचालक श्री.केतन व सौ.दीपाली कुलकर्णी आमंत्रित केले होते .त्या प्रसंगी केतन कुलकर्णी यांनी विदयार्थीना मार्गदर्शन करतांना आम्ही या शाळेचा विदयार्थी असुन शालेय जीवनातील संस्कार आणि धंद विदयार्थीना त्याच्या पुढील वाटचाली साठी दिशादर्शक असतात.कुठलेही ध्येय ठरविल्या नंतर यश मिळवण्या साठी खडतर परीश्रम व सातत्य आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.या प्रसंगी नेपाळ येथे भारतासाठी सुवर्ण पदक मिळवलेल्या डाॕ.सुषमा आचारी तसेच महाराष्ट्र सौदर्य सम्राज्ञी २०२१च्या विजेत्या डाॕ.दिपाली आचारी यांचा देखिल गौरव करुन त्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी देखिल विदयार्थीना आपल्या यशाबद्दल सविस्तर माहीती सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना पर्यवेक्षक गायकवाड आर.बी यांनी विदयालयाच्या गौरवशाली इतिहास व विविध सांकृतिक वाटचालीचा आलेख स्पष्ट केला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर होते.श्री.विरकर डी.व्ही यांना सर्वाना माझी वसुधंरा अभियान अंतर्गत सर्वाना शपथ दीली.
विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे यांनी कु.सुरभी कुलकर्णी व डाॕ.आचारी यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दील्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.श्वेता मालपुरे यांनी केले . तर आभार रायते यु.एस यांनी मानले. कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षक तुपसैंदर डी.व्ही,व्ही.एन.कार्ले,एन.के.बडजाते,सौ.बोरावके आर.आर,सौ.महानुभाव के.एच,कोताडे ए.जे,चौधरी आर.जे,आदी शिक्षक,विदयार्थी सोशल डीसटन्स पाळुन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *