ज्योती पतसंस्थेची सर्वाधिक बोनसची परंपरा कायम:- अॅड. रविकाका बोरावके…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- संस्थेच्या प्रगतीमध्ये ठेवीदार , कर्जदार व खातेदार यांचे बरोबर संचालका इतकाच कर्मचा – यांचा मोलाचा भाग असतो . चांगले कर्तव्यदक्ष कर्मचारी हेच खरे संस्थेचा कणा असतात . ज्योती पतसंस्थेच्या ३३ वर्षाच्या वाटचालीमध्ये २४० कोटी ठेवी व ३ ९ ० कोटी उलाढालीचा टप्पा पार करतांना विशेष आनंद होत आहे . या वर्षीच्या दिवाळी बोनससाठी कर्मचा – यांना २५ टक्के बोनस सर्वात अगोदर जाहीर करून २५ तारखेलाच कर्मचा – यांच्या खात्यात वर्ग करणेत आला आहे . त्याचप्रमाणे दस – याच्या मुहूर्तावरच सर्व सभासदांच्या खात्यामध्ये १२ टक्के लाभांशही जमा करणेत आला आहे . अशी माहीती संस्थेचे चेअरमन अॅड . रविकाका बोरावके यांनी सांगितली . कोविड सारख्या अडचणीच्या काळातही संस्थेची प्रगतीची घोडदौड कायम आहे . सप्टेंबर अखेर आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतच संस्थेने विक्रमी नफा मिळवला असून , संस्था अनेक नवे नवे विक्रम पार पाडत असल्याचे गौरवोदगार सरव्यवस्थापक दिलीप रांधवणे यांनी काढले . बँकींग व्यवसायात संस्थेने नावलौकीक प्राप्त केला असून अनेक पारितोषकेही पटकाविले आहे . महाराष्ट्रातील अग्रगण्य नव नवे विक्रम करण्यासाठी सर्वच ज्योती परिवार परिश्रम घेत असतो . तसेच अनेक सामाजिक उपक्रमामध्येही संस्था नेहमी अग्रेसर असते . अशी माहिती अॅड . रविकाका बोरावके यांनी दिली . सर्व नागरिक व खातेदारांना दिपावलीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *