के.जे.सोमैया महाविद्यालयात तीन दिवसीय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन…

कोपरगाव प्रतिनिधी :- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार कै. के.बी. रोहमारे (दादा) यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन संपन्न झाले. ही स्पर्धा दि.24 ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत होत असून या बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन कोपरगाव तालुका […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूलचे गुणवत्ता पूर्ण शिक्षण:- सिद्धाराम सालीमठ, जिल्हाधिकारी…

कोपरगाव प्रतिनिधी : शिक्षण क्षेत्रात समता इंटरनॅशनल स्कूलची प्रगती उल्लेखनीय आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था असल्याचा नावलौकिक देशात निर्माण केला आहे. समता इंटरनॅशनल स्कूलच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे समताचे विद्यार्थी भविष्यात उज्वल यश संपादन करणार असल्याचा विश्वास अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केला.समता इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२४ – २५ […]

Read More

निळवंडे लाभ क्षेत्रातील सर्व पाझर तलावलघु बंधारे भरून द्या आ. आशुतोष काळेंच्या सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील वर्षी उन्हाळ्यात योग्य नियोजन केल्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही. त्याप्रमाणेच यावर्षी देखील नागरिकांना पाणी टंचाई जाणवणार नाही याची काळजी घेवून निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव, गाव बंधारे, पाणी पुरवठा योजनांचे तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभाग व प्रशासनाला दिल्या […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील चिक्कू फळाला मिळाला उच्चांकी दर…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील उद्यानविद्या विभागातील चिक्कू फळांच्या विक्रीतून एकूण 40 लाखांचा महसूल विद्यापीठास प्राप्त झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत चिक्कू फळापासून मिळणाऱ्या महसुलात 23 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. विद्यापीठातील उद्यानविद्या विभागाच्या प्रक्षेत्रावर कालीपत्ती, क्रिकेट बॉल इ. चिक्कू वाणांची दहा हेक्टर क्षेत्रावर चिक्कू फळबागा असून त्यात एकूण उत्पादनक्षम 972 फळझाडे आहेत. […]

Read More

रोबोटिक उत्क्रांतीत सहभाग महत्वाचा:-पोलीस निरीक्षक संदिप कोळी ;ए. आय. आणि रोबोटिक या विषयावर तीन दिवसीय विशेष प्रशिक्षणाचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-विज्ञान आणि तंत्रज्ञान युगात रोबोटिक उत्क्रांती होते आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक तंत्रज्ञान युगात सर्व घटकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन कोपरगांव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांनी केले.रयत शिक्षण संस्थेचे श्री सदगुरु गंगागीर महाराज महविद्यालय, कोपरगांव,द बाॅम्बे मदर्स अॅन्ड चिल्ड्रेन वेल्फेअर सोसायटी, राजगुरुनगर, सूर्यतेज संस्था, कोपरगांव यांचे वतीने उच्च माध्यमिक शिक्षण घेणा-या […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात अंतरराष्ट्रीय आंतरसंस्कृती देवाणघेवाण कार्यक्रमाचे आयोजन….

कोपरगाव प्रतिनिधी:-के . जे. सोमैया महाविद्यालय व यू. आय. टी. एम., मारा युनिव्हर्सिटी केदाह ब्रँच , मलेशिया दरम्यान मागील दोन महिन्यापासून सुरु असलेल्या “विंडो टू द बॉर्डरलेस वर्ल्ड २.० (डब्ल्यू . बी. डब्ल्यू २.०) : इंटरकल्चर कम्युनिकेशन व्हाया इंटरनॅशनल कॉलॅबोरेशन प्रोजेक्ट” या ऑनलाईन अंतरसांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रमाचा समारोप समारंभ नुकताच पार पडला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य […]

Read More

ऊसतोड मजुरांच्या चिमुकल्यांना उबदार कपड्यांचे वाटप , सामाजिक बांधिलकी : राहुल दादा टेके पाटील ट्रस्टचा उपक्रम…

कोपरगाव प्रतिनिधी : तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने सालाबादप्रमाणे दोन दिवसीय उपक्रमात वारी ग्रामपंचायतचे दिवंगत सदस्य राहुल (दादा) टेके पाटील यांच्या स्मरणार्थ वारीतील परशुराम बाबा मंदिर परिसरातील व जगदंबा देवी मंदिर परिसरात वास्तव्यास असलेल्या कष्टकरी ऊसतोड मजुरांच्या शंभरपेक्षा जास्त चिमुकल्यांना कडाक्याच्या थंडीत त्यांच्या फडात जाऊन उबदार कपड्यांचे (कानटोपी) सामाजिक बांधिलकीतून […]

Read More

संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु. कॉलेज ‘व्हीजनरी मॅनेजमेंट’ पुरस्काराने सन्मानित,विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी मुंबई मध्ये स्वीकारला पुरस्कार…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला उत्कृष्ट निवासी संस्था असा दर्जा देवुन अनेक निकषांच्या आधारावर इंडियन स्कूल्स अवार्ड या संस्थेने ‘व्हीजनरी मॅनेजमेंट अवार्ड’ने सन्मानित केले. संस्थेचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी हा पुरस्कार मुंबईच्या हॉटेल मॉरीओट येथे राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताला कुस्तीमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवुन देणाऱ्या फ्रीस्टाईल कुस्तीपटू गीता […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे ‘सर्वोत्कृष्ठ आसवनी व्यवस्थापक’ पुरस्काराने सन्मानित…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने विविध संस्था कार्यरत असून त्यापैकी अग्रस्थानी व अग्रेसर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अर्थात व्हीएसआय हि संस्था आहे.या संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘सर्वोत्कृष्ठ आसवनी व्यवस्थापक’ पुरस्कार सहकारी साखर कारखानदारीत अग्रेसर असणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर वसंतराव आभाळे यांना देवून गौरविण्यात […]

Read More

पोहेगाव पोलीस दुरुक्षेत्र कार्यालय पूर्ववत सुरु कराआ.आशुतोष काळेंच्या पोलीस अधीक्षकांना सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोहेगाव येथे नुकत्याच सुवर्ण पेढीवर पडलेल्या दरोड्याच्या घटनेमुळे कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीनुसार पोहेगाव पोलीस दुरक्षेत्र कार्यालय (पोलीस चौकी) पूर्ववत सुरु करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना केल्या आहेत अशी माहिती कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय शिंदे यांनी दिली […]

Read More