कोपरगाव तालुक्यातील प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावा, स्नेहलताताई कोल्हे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी…

शिर्डी दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी स्नेहलताताई कोल्हे यांची विविध विषयांवर चर्चा…कोपरगाव प्रतिनिधी:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज बुधवारी (२३ नोव्हेंबर) शिर्डी दौऱ्यावर आले असता भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी कोल्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत कोपरगाव तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा केली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून १०० टक्के […]

Read More

गोवर्धन बियाणी यांची नांदेड जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):- नांदेड जिल्हा पत्रकार संघाची मुदत संपल्याने विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असून विद्यमान कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केली आहे..नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची मुदत चार वर्षांपुर्वीच संपली मात्र कोरोना आणि अन्य कारणांमुळे निवडणुका शक्य झाल्या नाहीत.. त्यामुळे पत्रकार संघाच्या […]

Read More

कुक्कुट पालन व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समतीचे गठन,, पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील यांची माहिती…

(शिर्डी):- राज्यात खासगीरित्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींवर उपययोजना करण्यासाठी राज्यात प्रथमच राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.या समितीच्या स्थापनेचा शासन आदेश निर्गमित झाला असून, 11 सदस्यांच्या समितीची संरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. […]

Read More

राज्यात ‘पासपोर्ट’च्या धर्तीवर ‘जात वैधता प्रमाणपत्र’ देणारा अहमदनगर पहिला जिल्हा, मुख्यमंत्र्यांची घोषणा जिल्ह्यात मूर्त स्वरूपात…

‘मंडणगड पॅटर्न ’च्या अंमलबजावणीला ही जिल्ह्यात सुरूवातकोपरगाव प्रतिनिधी:-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९ नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथील सामाजिक न्याय भवन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून भाषण करतांना ‘‘आता यापुढे पासपोर्टच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येईल.’’ अशी घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा प्रत्यक्षात अहमदनगर जिल्ह्यात मूर्त स्वरूपात आली आहे. पासपोर्टच्या धर्तीवर जागेवरच कागदपत्रे तपासून जातवैधता […]

Read More

के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी क्रिकेट संघ विजयी…

कोपरगाव प्रतिनिधी:-सोमैया विद्याविहार, मुंबई येथे सोमैया ग्रुपच्या वतीने पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन टॉस २०२२ क्रिकेट स्पर्धेत के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय, कोपरगाव शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी क्रिकेट संघ विजयी झाला आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. यादव यांनी दिली. सोमैया ग्रुप, विद्याविहार, मुंबई यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यांतील सोमैया […]

Read More

खेळातुन जीवनाला शिस्त लागते:- अतिरीक्त पोलीस अधिक्षिका स्वाती भोर…

संजीवनी पाॅलीटेक्निकमध्ये मुलींच्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन…कोपरगांव प्रतिनिधी:- विविध खेळांच्या स्पर्धेत स्पर्धा म्हणुन न खेळता खेळ म्हणुन खेळावे. स्पर्धेत हारजीत होते तर खेळातुन आनंद मिळतो. सांघिक आणि वैयक्तिक खेळातुन जीवनाला शिस्त लागतेे, जे खेळाडू असतात ते जीवनात शिस्तीने वागुन यशस्वी होतात, असे प्रतिपादन श्रीरामपुर विभागाच्या अतिरीक्त पोलीस अधिक्षिका स्वाती भोर यांनी केले.संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निक आयोजीत व […]

Read More

कोपरगाव शहरात आ. आशुतोष काळेंनी राबविलेल्या, मतदार नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी पात्र मतदारांची नोंदणी करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात राबविलेल्या मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबिरास उस्त्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.पुढील काही दिवसात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीत पात्र मतदारांना नाव नोंदणी करण्यासाठी व ज्या मतदारांची मतदार यादीत काही दुरूस्ती […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी देवराम देवकर तर उपाध्यक्षपदी सुदाम उगलमुगले यांची बिनविरोध निवड…

कोपरगांव प्रतिनिधी:- राज्यात नावाजलेल्या व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी देवकर केदू देवकर तर उपाध्यक्षपदी सुदाम नामदेव उगलमुगले यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.तालुक्यातील सहकारमहर्षी शंकरराव […]

Read More

कोपरगांव व शिर्डी परिसरात वृक्ष चळवळ निर्माण करणारा अवलिया,, ५० हजार वृक्षांना पालकत्व…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने देण्यात येणारा मानाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार – २०१९’ हा कोपरगांव येथील वृक्ष व पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांना जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय व्यक्तींमध्ये दूसरा तर नाशिक विभागाचा प्रथम अशा दोन पुरस्कारांचा यामध्ये समावेश आहे. अशा या पर्यावरण दूताच्या वृक्ष संवर्धनाच्या कार्याचा परिचय करून देणारा लेख…. वर्तमान आणि […]

Read More

एस.एस. जी. एम. महाविद्यालयात टायपिंग व स्टेनो कोर्स सुरू…

कोपरगाव प्रतिनिधी:- शासकीय सेवेकडे ग्रामीण विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर ओढा असला तरी त्यासाठी लागणारे कौशल्य त्यांना प्राप्त नसते.हे लक्षात घेऊन येथील एस. एस. जी. एम. महाविद्यालयात टायपिंग व स्टेनो कोर्स सुरू करण्यात आला आहे.सहा महिने कालावधीच्या या कोर्सचे उद्घाटन नुकतेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप यांच्या अध्यक्षतेखाली आणि संकल्प फाउंडेशनचे सचिव श्री. जावेद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत […]

Read More