यालाच म्हणतात ‘आयत्या पिठावर रेघा’:-बाबुराव थोरात…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आपल्या कार्यकाळात उजनी उपसा जलसिंचन योजना चालू आहे बंद यांची ज्यांना माहिती नव्हती. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या अर्धवट ऐकीव माहितीवर उजनी उपसा जलसिंचन योजनेबद्दल श्रेय घेणे केविलवाणे असून यालाच म्हणतात ‘आयत्या पिठावर रेघा’ असा उपरोधिक टोला रांजणगांव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांनी मा.आ.कोल्हेंना लगावला आहे.रांजणगाव देशमुख, धोंडेवाडी, वेस, […]

Read More

धूळमुक्त नाही तर कोपरगाव चिखलयुक्त झाले आहे:- महेंद्र नाईकवाडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरासह तालुक्यात रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे.केवळ सोशल मीडियावर विकास पसरला पण प्रत्यक्षात रस्ते वीज आणि पाण्याचे मूलभूत प्रश्न ऐरणीवर आले आहे. ठराविक कार्यकर्त्यांचा विकास करून विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार काळे हे तालुक्याचा विकास झाल्याच्या गप्पा करत असतील तर दुर्दैवी आहे.कोपरगाव धूळमुक्त झाले नसून अल्पशा पावसातच त्या धुळीचे चिखलात रूपांतर होवून कोपरगाव चिखलयुक्त झाल्याची […]

Read More

संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे कार्यकारी विश्वस्त अमितभैय्या नितीनदादा कोल्हे यांना वाढदिवसाच्या साईमय शुभकामना:- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांचा ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बाळकडू देवून जागतिक उच्च शैक्षणिक क्षेत्रातील नकाशावर संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे नाव झळकत ठेवून देशातील विद्यार्थ्यांना गत चाळीस वर्षात आंतरराष्ट्रीय व देशातील अव्वलस्थानी असलेल्या विविध कंपन्या आणि उद्योगात गलेलठ्ठ पगाराच्या किमान लाखभर नोकऱ्या मिळवून देण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी अध्यक्ष नितीन कोल्हे यांच्या कुशल नेतृत्वाखाली सर्वस्व […]

Read More

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूल प्रथम…

कोपरगाव प्रतिनिधी:- अहमदनगर जिल्हा क्रिडा विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. जिल्हास्तरावरील फुटबॉल स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने चमकदार कामगिरी केल्यामुळे समताच्या फुटबॉल संघाची विभागीय स्तरावर निवड झाली असल्याची माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे यांनी दिली.अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथील […]

Read More

शासकीय इमारतीमुळे कोपरगाव शहराच्या वैभवात भर:- मंदार पहाडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- शासकीय इमारतीमध्ये येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येवू नये व त्यांची कामे लवकरात व्हावी व त्यांना सोयी सुविधा मिळाव्यात या उद्देशातून आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील विविध शासकीय इमारतींना मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. मोठ्या डौलाने उभ्या राहिलेल्या या शासकीय इमारतीमुळे कोपरगाव शहराच्या वैभवात भर पडली असल्याचे माजी नगरसेवक मंदार […]

Read More

प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या उपस्थितीत कोपरगावला रविवारी राष्ट्रवादीचा मेळावा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनीलजी तटकरे यांच्या उपस्थितीत तसेच माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार (दि.२८) रोजी दुपारी ४.०० वा. कृष्णाई बॅक्वेट हॉल कोपरगाव येथे मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित केला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे […]

Read More

संजीवनीचे विद्यार्थी रसियात बेस्ट प्रोजेक्ट अवार्डने सन्मानित 20 पेक्षा अधिक देशातील विद्यार्थ्यांशी केली स्पर्धा…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स (एसजीआय) संचलित विविध संस्थाचे १५ विद्यार्थी संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने वर्ल्ड रॅन्क ३३१ असलेल्या उरल फेडरल युनिव्हर्सिटी (उर्फु), रसिया येथे २० दिवसाच्या संशोधनात्मक आंतरवासीतेसाठी (रिसर्च इंटर्नशिप ) गेले होते. त्यांचा जाणे, येणे, राहणे व जेवण यासाठी उर्फु व रसिया सरकारने शिष्यवृत्ती दिली होती. १५ पैकी ६ विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट […]

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत ‘आत्मा मालिकचे’ ४८ विद्यार्थी गुणवत्ता यादीतआदिती हुले राज्य गुणवत्ता यादीत १५ व्या स्थानी…

कोपरगांव प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकु‌लाच्या ४८ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. यामध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थी तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ४५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आदिती हुले ही […]

Read More

डाक विभागाच्या ‘डाक चौपाल’ उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पोस्ट विभागाकडून विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – आ. आशुतोष काळे व कोळपेवाडी पोस्ट कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुरेगाव, कोळपेवाडी व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी गुरुवार (दि.२५) रोजी कर्मवीर शंकरराव काळे सभागृह गौतमनगर येथे ‘डाक चौपाल’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास नागरिकांचा उस्त्फुर्त प्रतिसाद मिळाला असून डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना मिळाल्यामुळे डाक विभागाचे बदलेले रूप […]

Read More

उपजिल्हा रुग्णालयामुळे कोपरगाव मतदार संघाची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होणार:- विरेन बोरावके…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आ. आशुतोष काळे यांनी निवडून आल्यापासून केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगावला १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. हे काम सध्या प्रगतीपथावर असून उपजिल्हा रुग्णालयामुळे कोपरगाव मतदार संघाची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याचे माजी नगरसेवक विरेन बोरावके यांनी म्हटले आहे.कोपरगाव विधानसभा मतदार […]

Read More