लायन्स क्लब व लिओ क्लब कोपरगाव यांची शिर्डी साई आश्रयाला भेट…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देने लागतो. तसेच समाजात राहत असताना सामाजिक बंधिकली जपणे हे आपले सर्वांचे कर्त्यव्य आहे. हीच कर्त्यव्य भावना समोर ठेऊन लायन्स क्लब ऑफ कोपरगाव समाजात वेगवेगळे समाजपयोगी उपक्रम राबवत असतो.
समाजातील गरजूंना मदत करणे हाच क्लब चा मुख्य हेतू आहे. आणि हाच हेतू साध्य करण्यासाठी लायन्स क्लब व लिओ क्लब ऑफ कोपरगाव ने शिर्डी येथील साई आश्रयालय येथे भेट दिली.
श्री गणेश दळवी सर हे तेथील सगळे नियोजन बघतात.
तेथे 112 मुले आणि 50 वृद्ध आणि वृद्ध महिला राहत आहे.
या मुलांची व वृद्धांची गरज ओळखून लायन्स क्लब व लिओ क्लब कोपरगाव तर्फे मुलां, मुलींना मास्क,साबण,तेल,आणि टूथपेस्ट तर वृद्धांसाठी व्हीक्स,झेंडूबाम, व्हिटॅमिन व पेनिकलर गोळ्या, डायपर तसेच ग्लुकोनडी पावडर व अजून बरेच अशा दैनंदिन उपयोगी व जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.


यावेळी लायन्स क्लब कोपरगाव चे अध्यक्ष ला. राम थोरे,सचिव ला. अक्षय गिरमे,खजिनदार ला. सुमित भट्टड, ला. नितीन भडकवाडे, ला. परेश उदावंत, ला.अक्षय बोरा, ला.रुपेश शिरोडे लिओ क्लब चे अध्यक्ष लिओ. आदित्य गुजराथी, लिओ ध्रुव कुदळे, लिओ राहुल नाईक,लिओ देवेन चोप्रा आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *