
कोपरगाव प्रतिनिधी:-
मांगाच्या लेकिनी मुक्ता बनून मुक्त व्हावे:- प्रा क्रांती कांबळे
मांगाच्या मुली आजही अन्याय,अत्याचार, रूढी,परंपरा व अज्ञाना बरोबरच जाती व्यवस्थेच्या बळी ठरत असून यातुन बाहेर पडायचे असेल तर मांगा च्या मुलींनी थोर क्रांतीकारी मुक्ता साळवे यांचा आदर्श घेऊन मुक्त व्हावे असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाच्या विद्यार्थी आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्ष प्रा कु क्रांती कांबळे यांनी व्यक्त केले
मुक्ता साळवे यांच्या जयंती निमित्ताने समाज बांधवांशीशी संवाद साधताना प्रा कु क्रांती कांबळे म्हणाल्या की , ज्या काळात महिला व मुलींना विशेषतः बहुजन समाजाला शिक्षण घेणे हे मनुवादी व्यवस्थेने नाकारले होते त्या काळी महान समाज सुधारक ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाज शिक्षणा शिवाय आपला विकास करू शकत नाही हा थोर विचार मांडला त्या करिता प्रथम सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचे धडे दिले.
क्रांती गुरू लहुजी साळवे यांनी आपली पुतणी मुक्ता साळवे हिला ज्योतिबा फुले यांच्या शाळेत प्रवेश घेतला व शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्या शिकल्या मुळेच त्यांनी “आम्ही धर्म नसलेली माणसं” हा क्रांतीकारी निबंध लिहिला मात्र आजून खऱ्या अर्थाने मातंग समाजातील महिला मध्ये शैक्षणिक क्रांतीची पहाट उजाडली नाही हे दुर्दैव आहे
मातंग महिला मध्ये शिक्षण नसल्यामुळे अज्ञान,अंधश्रद्धा यांचे प्रमाण जास्त आहे त्याच प्रमाणे मातंग स्रिया अन्याय अत्याचारा बरोबरच जातीय मानसिकतेच्या बळी ठरत आहेत त्यामुळे मातंग समाजात क्रांतीचे वारे वाहत नाही
मातंग समाजाला या गर्तेतून बाहेर काढायचे असेल तर मांगा च्या मुलींनी मुक्ताचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन मुक्त व्हावे
लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन शोषण मुक्त समाज निर्मिती साठी काम केले जात आहे असे म्हटले आहे.
