कर्मवीर नगरमध्ये भूमिगत गटार व रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करावे; राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलची मागणी…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील कर्मवीर नगर ते शेख वस्ती या भागात ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना होत असलेल्या अडचणीची दखल घेऊन कोपरगाव नगरपरिषदेने कर्मवीर नगरमध्ये भूमिगत गटार अशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या वतीने मुख्याधिकारी रमेश गोसावी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कर्मवीर नगर भागात मुर्शतपूर, जेऊर पाटोदा, ब्रिजलाल नगर, माधवनगर, श्रद्धानगरी, जोशीनगर, धारणगाव रोड आदि परिसरात पाऊस झाल्यास सदरच्या पावसाचे पाणी ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे रस्त्यावर साचत आहे. त्याचा परिणाम रस्ते खराब होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना होत असलेल्या अडचणीची कोपरगाव नगरपरिषदेने तातडीने दखल घेऊन कर्मवीरनगर मध्ये भूमिगत गटार व रस्त्यांचे खडीकरण डांबरीकरण करावे अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे सरचिटणीस जुनेद भाई शेख, उपाध्यक्ष जावेद भाई शेख, मयुर राऊत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक मगर तसेच येथील रहिवासी विशाल भोईर, विशाल कुमावत, विवेक भावसार, समीर शेख, रामेश्वर वाणी, प्रशांत औताडे व कर्मवीर नगरमधील नागरिक उपस्थित होते.

फोटो ओळ- कर्मवीर नगरमध्ये भूमिगत गटार व रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करावे अशा आशयाचे निवेदन देतांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *