
कोपरगाव प्रतिनिधी:-
२८ मे रोजी कोळपेवाडी येथे कोरोना आर.टी.पी.सी.आर टेस्ट आणि रॅपिड टेस्ट कँम्प झाला. नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सरपंच सुर्यभान कोळपे यांनी ग्रामसेवक आणि पोलिस पाटील यांचेसह कॅंप यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली आहे. आरोग्य विभाग पं स कोपरगाव यांचेतर्फे तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र गावोगावी जाऊन नागरिकांची कोरोना टेस्ट करत आहेत.

या सर्व शिबिरांसाठी गावचे सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक, शिक्षक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांचे मोठे योगदान मिळत आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्ट झाल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यात येतात. परिणामी या रुग्णांमुळे होणारा प्रसार थांबविता येतो.
प्राआकेंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविका हे प्रचंड मेहनत घेत आहेत.
डॉ संतोष विधाते. तालुका आरोग्य अधिकारी पं.स कोपरगाव .
