
कोपरगाव प्रतिनिधी नाशिक:-असंघटित कामगार सामाजिक सुरक्षितता कायदा 2008 अंतर्गत नाभिक व्यावसायिकांची नोंद करण्यासाठी आज महाराष्ट्र नाभिक कृती समितीच्या वतीने मा. पालकमंत्री छगन भुजबळ साहेबांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कृती समितीचे अध्यक्ष संजय गायकवाड , अविनाश लोखंडे, नाना वाघ, रमेश आहेर, नितीन वाघ, अरुण सैंदाणे, राजेंद्र सोननीस, भाऊसाहेब आंबेकर आदी उपस्थित होते.महाराष्ट्र कृती समितीच्या वतीने अर्जाद्वारे 5 हजार व्यावसायिक यांची नोंदणी केली आहे. परंतु महाराष्ट्र मधील व्यावसायिक यांना अर्ज भरण्यास सुलभ व्हावे यासाठी कृती समितीने संकेतस्थळ सुरू केले.. यावेळी समितीच्या कार्यास शुभेच्छा देऊन शासन दरबारी नाभिक समाजाचा कामाचा योग्य निर्णय घेणार असल्याचे यावेळी सांगितले.
