कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, सोनेवाडी, चांदेकसारे परिसरातील शेतकऱ्यांना पिक काढणीच्या व ऊस तोडणीच्या वेळी येणारी शिवार रस्त्याची अडचण श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष यांनी सोडविली असून शेतकऱ्यांमध्ये तसेच या रस्त्याने नियमितपणे ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या झगडे फाटा ते धर्मा जावळे घर रस्ता मजबुतीकरण करणे कामाचे भूमिपूजन नुकतेच ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपस्थित मुस्लीम समाज बांधवांनी सदर रस्त्याला जोडून मस्जिदकडे जाणाऱ्या रस्त्याचे देखील मजबुतीकरण करून मिळावे अशी मागणी केली असता ना. आशुतोष काळे यांनी सदरची मागणी मान्य करून सबंधितास रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. आपली मागणी तत्परतेने मान्य केल्याबद्दल मुस्लीम बांधवांनी ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले. पोहेगाव प्रमाणेच डाऊच बु. येथील देखील नागरिकांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या २० लक्ष रुपये (इजिमा २१३) काशिनाथ तुळाजी दहे घर ते देर्डे चांदवड शिव रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन रोहमारे, सुनील शिंदे, आनंदराव चव्हाण, भीमराव दहे, धर्मा दहे, सरपंच शोभा माळी, हिंगणीचे सरपंच धनराज पवार, सागर पवार, शिवाजी दहे, सुभाष दहे, जगन्नाथ होन, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, नंदकिशोर औताडे, देवेन रोहमारे, एम.टी. रोहमारे, मधूकर औताडे, कौसर सय्यद, किरण होन, संजय रोहमारे, राजाभाऊ होन, द्वारकानाथ होन,राहुल जगधने, भानुदास दहे, भाऊसाहेब दहे, मच्छिंद्र दहे, भाऊसाहेब होन, शिवाजी पवार, विनायक पवार, किरण पवार, दादासाहेब दहे, जयवंत दहे, केशव दहे, अक्षय दहे, किरण दहे, कांतीलाल दहे, योगीराज होन, शिवाजी होन, भास्करराव होन, बाळासाहेब खरात, सुनील होन, अभिजित झगडे, वाल्मिक नवले, प्रभाकर होन, मधुकर खरात, जयवंत रोहमारे, रवींद्र खरात, नूरमोहम्मद शेख, शंकरराव चव्हाण, प्रशांत होन, संजय होन, प्रवीण होन, आप्पासाहेब चौधरी,मोहनराव होन, सागर दहे, दीक्षित दहे, बापूसाहेब दहे, योगेश दहे, रावसाहेब बढे, मिथुन दहे, नितीन दहे, सुमित होन, नितीन दहे, दगु गायकवाड, विजय चव्हाण, रमेश होन, रोहिदास शाक, संजय गायकवाड, दिनेश गायकवाड, सोमनाथ पगारे, मन्सालाल दहे, ज्ञानेश्वर दहे, गणेश दहे, संजय ढमाले, संदीप कांबळे, किसन पवार, गेनुदास दहे, कर्णा दहे, रामदास जाधव, भाऊसाहेब दहे, गोविंद कोळपे, सुनील बढे, निलेश दहे, उत्तम गायकवाड, अशोक बढे, गौतम दहे, मनसुख दहे, मच्छिंद्र ढमाले, राजेंद्र गायकवाड, सचिन होन, अदनान सय्यद, सतीश चव्हाण, अरुण खरात, नितीन होन, गुजर बाबा, शरद होन, जालिंदर थोरात, किसन जावळे, नामदेव नन्नवरे, अजित होन, पृथ्वी होन, अनिल होन, उत्तमराव सोळसे, सरपंच गंगाधर खोमणे, चांदभाई पठाण, गोरक्षनाथ पोटकुळे, उस्मान शेख, नामदेव लांडगे, भीमराज गाडे, नरहरी रोहमारे, साहेबराव होन, दादासाहेब होन, धनंजय चव्हाण, किशोर माकोने, सोपानराव होन, बाळासाहेब जाधव, पांडुरंग होन, सजन होन, दगु होन, नितीन शिंदे, दगु शेख, दौलत होन, कॉन्ट्रॅक्टर राजेंद्र जोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दहिफळे, ग्रामसेवक काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


फोटो ओळ:- पोहेगाव व डाऊच बु. येथे रस्त्याचे कामाचे भूमिपूजन प्रसंगी ना.आशुतोष काळे समवेत मान्यवर.
