कोपरगावच्या लोकप्रतिनिधिंच्या स्विय सहाय्यकांचा लोकशाहीवर हल्ला:- साहेबराव रोहोम…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गट व गण रचना नव्याने होत आहे.मुंबई येथे सर्व कार्यवाही अंतिम टप्प्यात असतांना मात्र कोपरगाव येथे तालुकास्तरावर तहसील कार्यायाचा वापर आमदारांचे पी.ए हे खाजगी कार्यालयासारखा करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली असल्याचा आरोप भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तहसील कार्यालय निवडणूक शाखेत जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण रचना होत असतांना सत्ताधारी आमदारांचे खाजगी दूत अक्षरशः शासकीय कार्यालयाचे संगणक हाताळत मनमर्जी पध्दतीने गैरव्यवहार करत आहेत का ?
कोपरगावमध्ये लोकशाहीचा गळा घोटण्याचे पाप सत्तेचा वापर करून सुरू आहे.आपल्या मर्जीप्रमाणे गावे वेगवेगळ्या गटात घालण्यासाठी प्रशासनावर दबाव आणून राजकीय सोयीचे सर्व काही दस्त बनवून घेतले जात आहेत. हा निंदनिय प्रकार एकीकडे जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी व तहसीलदार यांचा असतांना व तलाठयाकडून वरती अशी माहितीची प्रतवारी करावी असा संकेत असतांना मुजोर सत्तेच्या बळाचा वापर कोपरगाव मतदारसंघात घातला जात आहे.
ज्या प्रमाणे माहितीचा अधिकार वापरून सत्य समोर आणणाऱ्या किरीटजी सोमैय्या यांना त्रास देऊन प्रकरणे दडपण्यासाठी सरकार बळ वापरत आहे त्याच प्रकारे कोपरगावमध्येही वेगळे चित्र नाही. ताबडतोब या संदर्भात कार्यवाही व्हावी व सरकारी यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्यांना शासन व्हावे.
आमदार काळे यांच्या गटाची ग्रामपंचायत निवडणूकित झालेली धूळधाण त्यांना बोचत असल्याने व आगामी काळात होणाऱ्या पराभवाची चाहूल लागल्याने त्यांची पायाखालची जमीन सरकल्याने हा खटाटोप सुरू आहे असे साहेबराव रोहोम म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *