
कोपरगाव प्रतिनिधी:-
भारतीय वैद्यकीय संघटना (IMA),शाखा कोपरगाव अध्यक्षपदी डॉ.महेंद्रजी गोंधळी साहेब यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान कोपरगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री.मंगेशराव पाटील यांनी सन्मान करुन शुभेच्छा दिल्या आहेत…याप्रसंगी कोपरगाव औद्योगिक वसाहतचे संचालक डॉ.चंद्रशेखरजी आव्हाड, डॉ. मेघाताई गोंधळी,सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, छायाचित्रकार श्री.हेमचंद्रजी भवर उपस्थित होते…
कोरोना काळात ही डॉक्टर यांनी पेशंट ला सेवा देण्याचे काम केले.आय.एम.ए.अध्यक्ष डॉ. महेंद्रजी गोंधळी यांनी संघटनेच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मनोदय व्यक्त केला…
