
कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँगेसचा झेंडा फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँगेसचे सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष व सेलचे जिल्हाध्यक्ष यांची बैठक राष्ट्रवादी भवन येथे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांची चाचपणी करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांची मनोगते जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांनी जाणून घेतली.
तालुक्यात पक्षाचे संघटन मजबूत करत असतांना येणाऱ्या आगामी निवडणुकीत प्रत्येक जागेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा सक्षम उमेदवार तयार करावा. जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहनही ॲड.रविंद्रनाना पगार यांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले.

यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, माजी खासदार देविदास पिंगळे, महिलाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवकध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष यशवंत शिरसाट, ओबीसी सेलचे अध्यक्ष समाधान जेजुरकर, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, सेवादल अध्यक्ष राजेंद्र जाधव, ग्रंथालय सेलचे अध्यक्ष विजय पवार, वकील सेलचे अध्यक्ष शरद गायधनी, माहिती व तंत्रज्ञान विभाग सेलचे अध्यक्ष संकेत निमसे, निफाड तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, निफाड पूर्व तालुकाध्यक्ष जयदत्त होळकर, कार्याध्यक्ष भाऊसाहेब भवर, दिंडोरी तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, मालेगाव तालुकाध्यक्ष संदीप पवार, मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष विनोद चव्हाण, नांदगाव विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार, नांदगाव तालुकाध्यक्ष विजय पाटील, बागलाण तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, कळवण तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, सुरगाणा तालुकाध्यक्ष चिंतामण गावित, सटाणा शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, कळवण शहराध्यक्ष जितेंद्र पगार, देवळा शहराध्यक्ष दिलीप आहेर, येवला शहराध्यक्ष दिपक लोणारी, नांदगाव शहराध्यक्ष बाळकाका कलंत्री, हबिब शेख, सुनिता राजोळे, संगिता ढगे, उषा बच्छाव, सुवर्णा गांगोडे, हेमलता मानकर, पुनम गवळी, उषा भामरे, संगिता राऊत, सरीता हाडळ, विजय दशपुत्रे, सुनिल आहेर, सुयोग अहिरे, राजेंद्र सावकार, सागर वाघ, रमेश मंडलिक, पदमाकर महानुभव, संजीवन वाघ, विश्वास अहिरे, सुरेश जगदाळे, राजेंद्र लाठे, गजानन पगारे, रामदास गवळी, प्रकाश वाघ, सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात, शाबान तांबोळी, डॉ. धिरेंद्र चव्हाण, हरिभाऊ खैरनार, महेश पठाडे, पोपट खैरनार, धनंजय पाटील, डॉ.कृष्णा आहिरे, योगेश सोनवणे, गजानन कांदळकर, अरुण अहिरे, भाऊसाहेब पवार, ज्ञानदेव खैरनार, मुरलीधर खैरनार, प्रशांत बागुल, मच्छिंद्र बागुल, शरद महाले, चिंतामण गायकवाड, राजू पवार, नितीन ब्राम्हणे, उमेश बनकर, भुषण गांगुर्डे, सोपान पवार, दिगंबर सोनवणे, नारायण पोटे, जगदीश सोनवणे, शंकर मांजरे, सचिन सोनवणे, तुषार जाधव, संतोष लोखंडे, मोहन गावंडे, विजय गटकळ, नवनाथ शिल्लक, तौसीफ मनियार, अशोक आहेर, अनिल बोरस्ते, गिरीष गावित, जितेंद्र जाधव, योगेश नाठे, अशोक जाधव, शाम पताडे, नितीन भोये, रोशन अपसुंदे, शाम हिरे, अशोक पताडे, आर.के.खांदवे, मनोज सोनवणे, गजानन जाधव, बाळासाहेब भांगडिया यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी:- राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार समवेत पदाधिकारी दिसत आहेत.
