

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा संपन्न झाला. कोपरगाव शहरातील विरा पॅलेस हाँटेलच्या हाँल मध्ये ८ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा झाला असुन या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे राज ठाकरे यांचे विश्वासू कट्टर समर्थक वसंत तात्या मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराध्यक्ष त्याचबरोबर रूपाली ताई पाटील नगरसेविका पुणे उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यामध्ये उत्साहाचे वातावरण होते.भव्य मोटार सायकलच्या रँलिने प्रमुख पाहुण्याचे स्वागत करण्यात आले.शहरातील मेन रस्ता मनसेमय होवुन गेला होता.शहरात ठिक ठिकाणी बँनर लावण्यात आले होते.या बँनरची चर्चा दिवसभर होती. यावेळी प्रमुख पाहुणे वसंत तात्या मोरे म्हणाले की,कोपरगाव शहरात सतिष अण्णा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांची मोठी ताकद निर्माण झाली आहे.

त्यामुळे मनसेला कोपरगावात चांगले दिवस येणार आहे.त्याच बरोबर शिर्डीचे मंदिर चालु करावे यासाठी मागणीही केली आहे.बालाजी मंदिर चालु आहे मग शिर्डी मंदिर बंद का असा सवाल त्यांनी केला आहे.शहरात लावलेल्या बँनर बघून प्रमुख पाहुणे भारावून गेले होते.मोठ्या शहरात असे बँनर लागले जातात.परंतु छोट्या शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात बँनर पाहुन आम्हीही भारावून गेलो अशी प्रतिक्रिया प्रमुख पाहुण्यांनी दिल्या आहे. सतिष अण्णा काकडे,बापु काकडे यांनी कोपरगावात मोठ्या प्रमाणात संघटन निर्माण करुन तरूणांनी फौज निर्माण केली या शक्तीचा निवडणुकीत योग्य वापर करुन येणार्या निवडणुका लढवा. असे सुतावाच केले आहे.आम्ही तुमच्या पाठिंशी आहोत असे खंबीर आश्वासन सतिष अण्णा काकडे, बापु काकडे आणि मनसे सैनिकांना दिले आहे.पुढे रूपाली ताई पाटील म्हणाल्या की,सतिष अण्णा यांनी महिलांना पक्षात स्थान देवून खरोखर न्याय दिला असुन राजसाहेब ठाकरे यांचे विचार आत्मसात करुन कार्य करत आहे.आम्ही जिजाऊंच्या लेकी आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही. अन्याय अत्याचार विरोधात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढत आहे.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही काम करत आहोत. महिलांना अनेक ठिकाणी डावलण्यात येते परंतु सतिष अण्णा काकडे यांनी राज ठाकरे यांचे विचार आचरणात आणून महिलांना काम करण्याची संधी दिली आहे. येणारी निवडणुक लढविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. कोपरगाव नगरपरिषदेवर मनसेचा झेंडा फडकवणार आहे.अशा प्रतिक्रिया बापु काकडे यांनी दिल्या आहे.यावेळी देवी वस्ती धारंणगाव,सोनार वस्ती चर,रायगड सम्राट संजयनगर,लक्ष्मी नगर,मोहनीराजनगर, बेट,गांधीनगर ,१०५,खोपडी, गोधेगाव, कान्हेगाव, वारी, धोत्रे,दहेगाव बोलका,देर्डेफाटा येथील कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. तसेच या कार्यक्रमात दुग्धशर्करा योग जुळून अंजिक्य गणेश काकडे यांचा वाढदिवस सुध्दा त्याच दिवशी असल्याने त्यांचा वाढदिवस कार्यक्रमात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे वसंत तात्या मोरे पुणे शहराध्यक्ष,

रुपाली ताई पाटील पुणे महिला


शहराध्यक्ष,सतिश आण्णा काकडे मनसे शहराध्यक्ष,रघुनाथ मोहिते उपतालुकाध्यक्ष,अनिल गाडे. उपशहराध्यक्ष,विजय सुपेकर उपशहराध्यक्ष,बापु काकडे संस्थापक हिंदु सम्राट संघटना कोपरगाव,आनंद परदेशी विद्यार्थी शहराध्यक्ष,रोहित एरंडे विद्यार्थी तालुकाध्यक्ष,संजय जाधव विद्यार्थी उपशहराध्यक्ष,नितिन त्रिभुवन कामगार जिल्हाध्यक्ष,बंटी सपकाळ विद्यार्थी जिल्हा संघटक,जावेद भाई शेख वाहतूक तालुकाध्यक्ष,सचिन खैरे वाहतूक शहराध्यक्ष,नवनाथ मोहिते मनसे युवा नेते ,मुकुंद काकडे, राजु जाधव, माणिक मोहिते, बल्ली पाटोळे, छोटुभाई पठाण ,सागर महापुरे, जयेश जाधव , अनिकेत खैरे , महेश वारकर , सुनिल माळवदे,राज परदेशी, युवराज पवार,सुनिल मोहिते , अनिल सुपेकर, अंजिक्य काकडे , भारत गाडे , आकाश काकडे, पप्पु सोनवणे,आदि मनसैनिक उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नमनिर्माण सेनेच्या सर्वच पदाधिकारी यांनी कष्ट घेतले आहे.हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा झाला आहे.

