
कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.२ सप्टेंबर रोजी राष्ट्रसंत गाडगे महाराज सांस्कृतिक भवन, कोपरगाव येथे कोपरगांव तालुका परिट (धोबी) समाज महिला मंडळातर्फे व सौ.सिमाताई रंधे,,महिला प्रदेशाध्यक्षा व सौ.सुषमाताई अमृतकर,,महिला प्रदेशकार्याध्यक्षा,कु.श्वेतांबरीताई राऊत,,विभागीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने श्रावणमास निमित्त हळदी कुंकू तसेच कोपरगाव शहर महिला कार्यकारिणी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त पारंपारिक सणाला आधुनिकतेची जोड देत,”शिवा”विषयी महत्त्व सांगुन महिला सक्षमीकरण तसेच महिला संघटन,यावर जनजागृती करण्यात आली,तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी मोठ्या संख्याने समाज महिला भगिनी व युवती कार्यक्रमास उपस्थित होत्या. सदर कार्यक्रम सोशल डिस्टनसिंगचे पालन करून पार पाडण्यात आला,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय अध्यक्षा कु.श्वेतांबरीताई राऊत यांनी केले,तर कार्यक्रमाचे आभार सौ.कावेरी राऊत यांनी मानले.
कोपरगांव शहर महिला कार्यकारिणी
अध्यक्षा-सौ.लता पंकज दळवी
उपाध्यक्षा-सौ.भाग्यश्री गणेश बोरुडे
उपाध्यक्ष-सौ.नमिता राहुल भागवत
सचिव-सौ.मनीषा मीनीनाथ गवळी
खजिनदार-सौ.शितल विजय शिंदे
सदस्य-सौ.सारीका सुनील फंड
सदस्य-सौ.शीला मुकुंद राऊत
सदस्य-सौ.वैशाली नितीन शिंदे
सदस्य-सौ.निकीता भाऊसाहेब बोरुडे
सदस्य-सौ.स्नेहल आकाश गायकवाड
कोपरगांव शहर कार्यकारिणी पदी निवड झालेल्या सर्व महिला चे मन:पुर्वक अभिनंदन व पुढील समाजसेवेच्या हार्दिक शुभेच्छा…!

सदर कार्यक्रमात सौ.सिमाताई रंधे महिला प्रदेशाध्यक्षा व सौ.सुषमाताई अमृतकर महिला प्रदेशकार्याध्यक्षा महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा महिला मंडळ यांच्या वतिने प्रा.कु.श्वेतांबरी राऊत यांची महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ-पश्चिम-उत्तर महाराष्ट्र (औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर) विभागिय महिला अध्यक्षा पदी निवडझाल्याबद्दल श्री.गणेश गायकवाड राज्यप्रसिध्दीप्रमुख महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळ यांनी कु.श्वेतांबरीताई राऊत यांना राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार केला यावेळी श्री.सुनिल फंड जिल्हाध्यक्ष, श्री.संजयराव जगताप उपाध्यक्ष राज्य कार्यकारिणी, श्री.नितिष बोरुडे युवा नेते ,श्री.आकाश गायकवाड युवा नेते,, श्री.गोविंदराव राऊत उपाध्यक्ष लॉन्ड्री संघटना,, श्री.किशोर राऊत व कैलास राऊत आदि समाज बंधु व भगिनीन उपस्थितीत होते.
