श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ उत्साहाने संपन्न…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- श्रीमान गोकुळचंदजी विदयालय च्या वतीने मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून विदयालयात उत्साहाने संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन विदयालयांचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर हे उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय आॕलिंपिक असो.चे सहसचिव .श्री.नामदेवराव शिरगांवकर हे आॕनलाईन उपस्थित होते या प्रसंगी विदयालयांचे उपमुख्याध्यापक श्री.रवि पाटील, पर्यवेक्षक श्री.आर.बी.गायकवाड ,श्री.दिलीप तुपसैंदर,श्री.अमृतकर ए.बी,काले ए.के,विरकर डी.व्ही,श्री.कुडके डी.पी,श्री.बडजाते एन.के,कोताडे ए.जे. आदी शिक्षक व विदयार्थी आॕनलाईन या वेळी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या आरंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयांचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले. उपमुख्याध्यापक श्री.रवि पाटील यांनी सर्वाचे स्वागत केले.भारतिय आॕलिंपिक असो.सहसचिव श्री.नामदेव शिरगांवकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरिल कोरोना आजारा नंतर क्रीडा क्षेत्रातील चालु घडामोडीची माहीती स्पष्ट करुन नुकत्याच आॕलिपिंक मधील भालाफेकीतील सुवर्ण व अॕथलेटीक मधील रौप्यपदक मेंजर ध्यानचंद यांना श्रध्दांजली ठरेल असे स्पष्ट केले.मेजर ध्यानचंद यांचे हाॕकी खेळातील योगदान अविस्मरणीय आहे.आज क्रीडा क्षेत्रातील मोठा दिवस आहे यातुनच खेळाडुंनी प्रेरणा घेवुन आपल्या आवडत्या खेळात देशाला पदके मिळवुन दयावी असे सांगितले. या प्रसंगी कु.नेहा भोसले या विद्यार्थींने मेजर ध्यानचंद विषयी माहीती सादर केली तर कु. कल्याणी खैरनार हीने आॕलिपिक स्पर्धाचा आलेख स्पष्ट केला. कु.तनया संत हीने खेळातील शारीरिक क्षमतेचे महत्व सांगितले.

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे ,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे ,सचिव दीलीप कुमार अजमेरे व सहसचिव श्री.सचिन अजमेरे यांनी राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या. श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे व अहमदनगर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघाचे सचिव श्री.मकरंद को-हाळकर यांनी प्रास्ताविक करुन खेळाडु ,प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन क्रीडा शिक्षक श्री.एन.के.बडजाते यांनी तर आभार श्री.ए.के.काले यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यालयांतील सर्व शिक्षक तसेच क्रीडा शिक्षक , मार्गदर्शक , क्रीडा प्रेमी खेळाडू आॕन लाईन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *