Uncategorized

विद्यापीठस्तरीय ‘जल्लोष’ कला महोत्सवात एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचा सक्रिय सहभाग…

कोपरगाव प्रतिनिधी: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित विद्यापीठस्तरीय ‘जल्लोष’ कला महोत्सव २०२६–२७ मध्ये श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांची प्रभावी छाप उमटविली.दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय, संगमनेर येथे आयोजित या महोत्सवात महाविद्यालयाच्या २५ विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांत सहभाग घेतला. भारतीय शास्त्रीय वाद्यवादन, सुगम गायन, भारतीय शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, मिमिक्री, स्किट, पथनाट्य, रांगोळी, स्थळावर चित्रकला, चिकटकला/कागदकला तसेच माती काम अशा विविध कलाप्रकारांत विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेचे आणि कलात्मक प्रतिभेचे दर्शन घडविले.
विद्यार्थ्याच्या सन्मानाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले की, “ विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाले की त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवी दिशा आणि आत्मविश्वासाची नवी उंची मिळते. ‘जल्लोष’ कला महोत्सवातील विद्यार्थ्यांचा सहभाग ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब असून, विद्यार्थ्यांनी कलेसोबतच ज्ञान, कौशल्य आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रातही सातत्याने नवनवीन शिखरे गाठावीत.”
विद्यापीठस्तरीय व्यासपीठावर विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणे ही महाविद्यालयाच्या सांस्कृतिक वाटचालीतील महत्त्वाची बाब ठरली. अभ्यासासोबतच कला, सर्जनशीलता, अभिव्यक्ती आणि आत्मविश्वास यांना चालना देण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा हा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. विविध कलाप्रकारांतून विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता आणि कलात्मक जाणिवा प्रभावीपणे सादर केल्या.

या महोत्सवात अजय माळी, अर्जुन भुजाडे , श्रावणी निमसे, दिव्यानी जाधव, गौरी एखंडे, कल्याणी किरण कहार, पुष्पलता बेहरा, चैताली जाधव, सीमा शेख, सिफा शेख, नेहा पाईक, भक्ती गाडे, ओम मुठेकर, ईश्वरी वाकचौरे, हर्षद कानडे, यश डोंगरे, स्वरूप काळे, तनु भारती, समीक्षा कावडे, वेदांती शिंदे, तृप्ती देवकर, तेजस्विनी गारे, अर्पिता नागरे, आफरीन शेख आणि पूजा तुपसुंदर या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय सहभागाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. संदीप वर्पे,प्राचार्य डॉ. माधव सरोदे, सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ. संतोष पवार, प्रा. राजश्री जाधव, डॉ.संगीता दवंगे यांसह प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *