Uncategorized

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा रविवार (दि.११) रोजी गळीत हंगाम शुभारंभ…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ या वर्षाच्या ७२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवार (दि.११) रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे यांनी दिली आहे.

राज्य सरकारकडून चालू वर्षीचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण करून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी सज्ज झाला आहे. शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवत सहकाराची मूल्ये जपणारा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या दूरदृष्टीपूर्ण विचारांचा वारसा पुढे नेत, मा.आ. अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनातून आणि आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वातून विकासाची नवी शिखरे गाठत आहे. कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ.पुष्पाताई काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

७२ व्या गळीत हंगामाच्या सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सभासद वर्ग व उद्योग समूहावर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतक व कार्यकर्त्यांनी गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ व कारखाना व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *