
कोपरगाव प्रतिनिधी:-
यावर्षी दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी हनुमान जयंती सर्वत्र साजरी होत आहे कोपरगावातून सुद्धा यावर्षी होणाऱ्या हनुमान जन्मोत्सव चा उत्साह ओसंडून वाहत आहे.
त्यातला त्यात कोपरगाव माहेश्वरी समाज बांधवांच्या वतीने साजरी केला जाणारा हनुमान चाळीसा पाठ वैशिष्ट पूर्ण असतो. 2008 सालापासून गेली 19 वर्ष ही हनुमान जयंती साजरी होते. कोपरगाव पंचक्रोशीत बालाजी सत्संग मंडळ च्या वतीने होणारी ही हनुमान चालीसा पाठ कोपरगाव पंचक्रोशीत भक्तीमय वातावरण करण्यात प्रसिद्ध आहे. होळी पौर्णिमेपासून हनुमान जयंती पर्यंत इच्छुक असणाऱ्या माहेश्वरी व इतर समाजाच्या घरी जाऊन माहेश्वरी समाजाचे कार्यकर्ते संगीत हनुमान चालीसा पठण करतात व हनुमान जयंतीच्या दिवशी त्याची सांगता होते. कोपरगाव सराफ बाजार येथील बालाजी मंदिरात मोठ्या उत्साहाने माहेश्वरी समाज हनुमान जयंती साजरी करतो त्याचप्रमाणे संध्याकाळी संभाजीनगर येथील भद्रा मारुती येथे बस द्वारे जाऊन हनुमान चालीसा साजरी केली जाते त्यामुळे कोपरगावात एक भक्तिमय वातावरण तयार होऊन भक्त भारावून जातात हनुमान जन्मोत्सवच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा….!
॥ जय श्रीराम ॥
नारायणशेठ अग्रवाल, कोपरगाव.
