
कोपरगाव प्रतिनिधी:-
संजीवनी कोविड केअर सेंटर मध्ये उत्तमपणे रुग्णसेवा सुरु असून वैद्यकीय सेवा साधनांबरोबर रुग्णांचे आरोग्य जपण्याचे काम कौतुकास्पद आहे या उपक्रमामुळे रुग्णांना बरे होण्यास निश्चितच मदत होणार असून संजीवनीचा हा उपक्रम स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त श्री अर्जुन चिखले यांनी व्यक्त केली.

कोपरगांव तालुक्यातील कोकमठाण येथे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील संजीवनी कोविड केअर सेंटरला श्री चिखले यांनी आज भेट दिली. त्यांच्यासमेवत शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी श्री गोविंद शिंदे,तहसिलदार योगेश चंद्रे,गटविकास अधिकारी सचीन सुर्यवंशी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते उपस्थित होते,यावेळी श्री चिखले यांनी संजीवनी कोविड सेंटरची पाहणी केली.स्वच्छता आणि रुग्णांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजना पाहून रुग्णांना दिल्या जाणा-या वैद्यकीय सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.


सध्या राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या व शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन संजीवनी उद्योग समुहाने याकरीता कोविड केअर सेंटरची उभारणी केल्यामुळे या भागातील रुग्णांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होत आहे.यावेळी ऑक्सिजन बेड व्यवस्थेसह येथील विविध उपाययोजनांची पाहणी केली.
