

कोपरगाव प्रतिनिधी :-माझा अत्यंत लाडका तरुण सहकारी राहुल टेके याला खूप कमी आयुष्य मिळाले, परंतु; मिळालेल्या आयुष्यात त्याने समाजासाठी केलेलं काम हे खूप महत्वपूर्ण होते. आजही त्याच्यानंतर त्याच्या समाजसेवेच्या कार्याचा वसा राहुलच्या स्म्रुतितून गेली पाच वर्ष सातत्यानं वारी गावात सुरू आहे. हि बाब अत्यंत महत्वाची आहे. दिवाळीनिमित्त योग्य लाभार्थ्यांना वस्त्र व मिठाई वाटप करून त्यांचा दिवाळसण गोड करण्याचे हे सामाजिक बांधिलकीचे कार्य सातत्यपूर्ण सुरू असल्याने गौरवास्पद असल्याचे गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी काढले.


कोपरगाव तालुक्यातील वारी येथे सालाबादप्रमाणे राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिवाळीनिमित्त रविवारी ग्रा.पं. सदस्य राहुल दादा टेके पाटील यांच्या स्मरणार्थ वारी परिसरातील जवळपास 78 लाभार्थ्यांना राजेश परजणे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन वस्त्र व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके होते. कार्यक्रमाची सुरुवात राहुल दादा टेके यांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
याप्रसंगी बाजार समिती संचालक प्रकाशराव गोर्डे, माजी ग्रा.पं. सदस्य अँड.शरदराव जोशी, ग्रा.पं.सदस्य दौलत वाईकर, प्रा.डॉ. रवींद्र जाधव यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष मच्छिंद्र टेके पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राहुल टेके यांच्या आठवणींना उजाळा दिला. या उपक्रमाचे यंदाचे हे पाचवे वर्ष होते. या उपक्रमात कोपरगाव येथील सुंदरम कलेक्शनचे प्रदीप भंडारी यांचे विषेश सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी बाजार समितीचे संचालक प्रकाश गोर्डे, माजी सरपंच सतीशराव कानडे, अँड.शरदराव जोशी, माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे, सदस्य वाल्मिक जाधव, दौलत वाईकर, योगेश झाल्टे, प्रणाली देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे कोपरगाव तालुका कार्याध्यक्ष अरुण कदम, नरेंद्र ललवाणी, परसराम टेके, नानासाहेब टेके, तान्हाजी थोरमिसे, संजय थोरात, उत्तमराव वाकचौरे, दिलीप गडकरी, रमाकांत टेके, राहुल शिंदे, अण्णा बैसाने, बापूराव बहीरमल, संतोष भाटे, दिपक झालटे, विजय ठाकरे, रवींद्र टेके, स्मिता काबरा, निर्मला भारूड, नानी ठोंबरे, रोहिणी लोखंडे, शितल गायकवाड, योगिता पवार, विलास गोंडे, अशोक बोर्डे, पुंडलिक जमधडे, सुरज टेके, स्वप्निल टेके, पुरुषोत्तम टेके, अजिम शेख, अनिल भाटी,जावेद शेख, जयसिंग बनगैया, आकाश निळे, रुपेश लोखंडे, अविनाश दुशिग, राहुल मलिक, विकास बिरुटे, अनिल निकम, वाल्मीक महिरे, महेश टेके, आकाश बोर्डे, यश मैराळ, साहिल मैराळ, सनी जाधव, संतोष तळेकर, अशोक गायकवाड, सार्थक चव्हाण,आदित्य निळे, जगदीश संत,तुषार पठारे, शुभम जिरे, अमोल गायकवाड, अतुल गायकवाड, अशोक जमधडे, विजय काकळे,निखिल खेडकर,सुधीर वाकचौरे, शुभम गाडगे, सौरभ वायडे, अक्षय गाडगे, सुधीर कोडसने, गणेश शिंदे, नागेश पंडोरे यांच्यासह ट्रस्टचे सर्व स्वयंसेवक, राहुल (दादा) मित्र मंडळाचे सर्व सदस्य, वारी गावातील सर्व कौटुंबिक सदस्य, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार रोहित टेके यांनी तर माजी ग्रामपंचायत सदस्य गोरख टेके यांनी आभार मानले.
