
कोपरगाव प्रतिनिधी:-
अहिल्यानगर माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे अतुल कोताडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
गुरुवार दि. 20 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ११•३५वा. माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे कला शिक्षक अतुल कोताडे यांनी नामनिर्देशन पत्र अर्थात उमेदवारी अर्ज अहिल्यानगर येथे दाखल केला.या प्रसंगी परिवर्तन मंडळाचे मा.श्री.आप्पासाहेब शिंदे, मा .श्री राजेंद्र लांडे, व माध्यमिक शिक्षक संघाचे ज्येष्ठ नेते गजानन शेटे सर आणि कैलास थोरात सर , श्री अनिल गवळी सर, श्री बोंडवे सर व इतर संघटनेचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दाखल केले
यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय (जिल्हा निबंधक, सहकारी संस्था नगर कार्यालय, एडीसीसी बँक मुख्य शाखा, तिसरा मजला, अ.नगर ) येथे उपस्थित राहून उमेदवारी अर्ज दाखल केला.
नेहमीच संघटनेच्या माध्यमातून अन्याया विरुद्ध संघर्ष करताना आपण मला साथ दिली यापुढेही बॅन्केच्या निवडणुकीत मला साथ कायम द्याल अशी अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी कोपरगांश एज्युकेशन अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत ठोळे,डाॅ.अमोल अजमेरे,आनंद ठोळे,राजेश ठोळे, आदिनी शुभेच्छा दिल्या.
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय, कोपरगावचे निवृत्त शिक्षक श्री.दीलीप तुपसैंदर,अरुण चंद्रे,मकरंद कोऱ्हाळकर, सुरेश बोळींज, वाकचौरे,सोसायटीचे माजी संचालक श्री.बाळासाहेब सोनवणे,मा.शिवाजीराव लावरे,माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रविण निळकंठ,अरुण बोरणारे,संतोष तांदळे,निलेश बडजाते आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहे.
