
कोपरगाव प्रतिनीधी:-
कोपरगाव शहर व तालुक्या मध्ये कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन याबाबी रुग्ण संख्येच्या तुलनेत कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. परिणामी रुग्ण मृत्युदर वाढला आहे.
कोरोना प्रतिबंध करणेकामी कोपरगाव शहरातील स्थानिक नागरिक, व्यापारी व सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचे मागणीनुसार शुक्रवार दि.३०/०४/२०२१ रोजी रात्री ८.०० वा पासून ते शनिवार दि.०८/०५/२०२१रोजी सकाळी ७.०० वा पर्यंत जनता कर्फ्यु राहणार आहे. या दरम्यान फक्त शहरातील दवाखाने, मेडिकल (२४ तास), पाणी जार व दुध (सकाळी ७ ते ११वा.यावेळेत) विक्री वगळता भाजीपाला, फळे, किराणा व
इतर सर्व व्यवसाय १००% बंद राहतील.*
कोपरगाव शहरातील सर्व नागरिक, आस्थापना, व्यापारी यांना कळविण्यात येते की, आपण जीवना आवश्यक साधन सामुग्री येत्या दोन दिवसात जमा करावी.
दिनांक ०८/०५/२०२१ शनिवार पासून मा.जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार सकाळी ७ ते ११ यावेळी अत्यावश्यक आस्थापना सुरू राहतील.
कोरोनाचा प्रादुर्भाव व मृत्युचे थैमान थांबविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करून प्रत्येकाने स्वतःचा व कुटूंबाचा बचाव करावा ही नम्र विनंती.
नियमाचे उलघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
घरी राहा…. सुरक्षित राहा…
विजय वहाडणे नगराध्यक्ष,
स्वप्निल निखाडे उपनगराध्यक्ष,
सर्वपक्षीय नगरसेवक, कोपरगाव नगरपरिषद कोरोना नियंत्रण समिती, कोपरगाव…
