
कोपरगाव प्रतिनिधी :-
महर्षी आयुर्वेद युनिव्हर्सिटी USA व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन दिल्ली यांचे संयुक्त विद्यमाने पुणे येथे नुकतीच आठवी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद कॉन्फरेन्स संपन्न झाली .शनिवार व रविवार दि एक व दोन फेब्रूवारी रोजी झालेल्या या परिसंवादाचे उदघाटन मा .श्री प्रतापराव जी जाधव (आयुष मंत्री स्वतंत्र प्रभार भारत सरकार )यांचे शुभहस्ते करण्यात आले .सतरा देशातून शंभरच्या वर परदेशी डॉक्टर्स व भारतभरातून हजारच्यावर आयुर्वेद वैद्य या परिसंवादासाठी उपस्थित होते .विविध विषयावर आपले संशोधित विचार व्याख्यात्यांनी मांडले .आयुर्वेद प्रचार प्रसारातील अमूल्य योगदानाबद्दल विशेष सत्कार म्हणून कोपरगाव येथिल सुप्रसिद्ध आयुर्वेदतज्ञ् डॉ रामदास आव्हाड यांना मा.प्रतापराव जाधव साहेब यांचे शुभहस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .यावेळी डॉ टोनी नाडर (चेअरमन -महर्षी आयुर्वेद युनिव्हर्सिटी ,अमेरिका ),डॉ जयंत देवपूजारी (अध्यक्ष-भारतीय आयुर्वेद चिकित्सा संस्थान ),डॉ मनोज नेसरी (आयुर्वेद सल्लागार -भारत सरकार ),पद्मश्री पदमभूषण डॉ देवेंद्र त्रिगुणाजी (अध्यक्ष राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ दिल्ली ),डॉ मोमाया (हॉलंड ),डॉ पी डी पाटील (डी वाय पाटील विद्यापीठ ),खासदार श्रीरंग बारणेसाहेब व अन्य मान्यवर उपस्थित होते .अत्यंत शानदार सोहोळ्यात डॉ रामदास आव्हाड यांना सन्मानित करतांना त्यांचे आजपर्यंतच्या सर्व कार्याचा गौरव करण्यात आला .मागील वर्षीच्या भारत सरकारच्या राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कारानंतर हा आंतर राष्ट्रीय स्तरावरील सन्मान कोपरगाव वासी डॉ रामदास आव्हाड यांचे कार्यावरील शिक्कामोर्तब मानण्यात येतो ..आजपर्यंत आयुर्वेदामुळे पन्नासहून अधिक पुरस्कार डॉ आव्हाड यांना मिळाले आहेत ..आयुर्वेदामुळेच हे यश मिळाल्याचे डॉ आव्हाड सांगतांना आयुर्वेद हे विश्वातील मुख्य आरोग्यशास्त्र कसे बनेल हे अभिमानाने सांगतात ..त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ..
