
कोपरगाव प्रतिनिधी:- पुणे विभागाकडून घेण्यात आलेल्या एस. एस. सी.परीक्षेत कोपरगाव येथील कन्या विद्यालयाची कु.ज्ञानेश्वरी लोहकणे ९७.४०टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम आली तसेच रवंदे येथील शिवशंकर विद्यालयाची विद्यार्थिनी कु.समृद्धी विजय शेळके हिने ९५.८०टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला तसेच तालुक्यातील ग्रामीण विभागातून प्रथम क्रमांक मिळविला तसेच कोपरगाव तालुक्यातून द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.समृद्धी ही सांगवी भुसार येथील पत्रकार विजय शेळके यांची कन्या आहे.कोपरगाव येथील कॉनक्यूरोर अकॅडमी तर्फे नुकताच तालुक्यातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तिला वर्गशिक्षिका शालन ढोले,रामचंद्र चावरे,मुख्याध्यापक बी.आर.बीरे,उज्ज्वला म्हस्के यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून तिच्या या यशाबद्दल स्कूल कमिटीचे सदस्य बाळासाहेब कदम, जि.प.माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, डॉ.सुजय विखे,आमदार आशुतोष काळे, स्नेहलताताई कोल्हे,राहुल विखे,बाबासाहेब गोसावी,ज्ञानदेव गायकवाड यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
