श्री क्षेत्र धामोरी येथे श्री माणकेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्रीक्षेत्र अडबंगीनाथ जन्मभुमी, तपोभुमी व दिक्षाभुमी, श्री गोरक्षनाथ मंदिर, श्रीक्षेत्र धामोरी मठाधिपती प.पू. गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते शुभाशिर्वादाने व मार्गदर्शनाखाली श्री माणकेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी प.पू. दत्तगिरीजी महाराज प. पू. ज्ञाननंदगिरीजी महाराज प. पू. निवृत्तीगिरीजी महाराज प. पू. राम प्रभू महाराज प. पू. विमलगिरी महाराज महेश महाराज प. पू. भोलेगिरीजी महाराज’,श्री १००८ शारदानंदगिरीजी माताजी प. पू. विकासगिरीजी महाराज प. पू. मौनगिरी महाराज ह.भ.प. शिवाजी महाराज तळेकर
कार्तिक महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री माणकेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे.शनिवारी दिंनाक १६ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर २०२३ या काळात विविध कार्यक्रम आयोजन केलेले असुन कार्यक्रम स्थळ श्रीक्षेत्र अधिष्ठाण अंडबंगीनाथ (माणिकनाथ) तपोभूमी. श्री क्षेत्र धामोरी येथे कार्यक्रम होत आहे.भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *