कोपरगांवकरांना आपदा प्रशिक्षणमहसूल सप्ताहानिमित्त आयोजन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी):- कोपरगांव तहसीलच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या‌ वतीने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना आपत्कालिन परिस्थितीतून मार्ग कसा काढावा व उपाययोजनेविषयी प्रशिक्षण देण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार संदिपकुमार भोसले, प्रशिक्षणार्थी तहसीलदार विकास गंबरे, तुरुंग अधिकारी चंद्रशेखर कुलथे , आपदा मित्र योगेश कोळगे, मुकुल अहिरे, किरण सिनगर, दिपक थोरात,‌ तेजस चव्हाण, विजय साटोटे, अमित खोकले, सुषमा खिलारी, सागर पवार, सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.


या प्रसंगी आपदा मित्र सहाय्यक योगेश कोळगे यांनी आपत्कालीन परिस्थिती हाताळणी , तसेच लाईफ जॅकेट तातडीने कसे परिधान करावे. याबाबत शास्रोक्त माहिती दिली. गोदावरी पात्रातील शुक्रतीर्थ घाटावर संपन्न झालेल्या कार्यक्रमात के.जे.सोमैय्या महाविद्यालयाचे विद्यार्थी- विद्यार्थीनी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांचे मार्गदर्शनाखाली महसूल सप्ताहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *