कोपरगांव कृषी उत्पन्ऩ बाजार समितीमध्ये मा.श्री.बिपीनदादा कोल्हेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त़ वृक्षारोपण…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष मा.श्री.बिपीनदादा कोल्हेसाहेब यांच्या वाढदिवसा निमित्त़ कोपरगांव कृषी उत्पन्ऩ बाजार समितीमध्ये सभापती मा.श्री.साहेबराव पा.रोहोम यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच संपन्ऩ झाला.
महाराष्ट्रात मागील काही वर्षापासून दुष्काळ पडत आहे. हा दुष्काळ निसर्ग निर्मित नाही. सततच्या झालेल्या वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या कमी होवून त्याचा परिणाम म्हणजे निसर्गाचा समतोल बिघडून मानवाच्या आरोग्यावर होत आहे. याकरीता महाराष्ट्र राज्याला समृध्द़ करण्यासाठी वृक्षलागवडीचे महत्त्व़ ओळखून कोपरगांव कृषि उत्पन्ऩ बाजार समितीमध्ये मा.श्री.बिपीनदादा कोल्हेसाहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य़ साधत वृक्षारोपन करण्यात आले सदरचे प्रसंगी उपसभापती मा.श्री.गोवर्धन पा.परजणे व सन्माननीय संचालक श्री लक्ष्मणराव शिंदे, साहेबराव लामखडे, संजयराव शिंदे, शिवाजराव देवकर, बाळासाहेब गोर्डे, खंडु फेपाळे, रामदास केकाण, प्रकाशराव गोर्डे, राजेंद्र निकोले, रावसाहेब मोकळ, अशोकराव नवले, ऋषीकेश सांगळे, रेवननाथ निकम, रामचंद्र साळुंके, मा.सौ.‍मिराताई कदम, मा.सौ.माधुरीताई डांगे, हमाल पंचायतचे श्री.भाऊसाहेब शेळके, व्यापारी दादासाहेब शिंदे, आप्पासाहेब सांगळे, महेंद्रशेठ ठक्क़र, आप्पासाहेब वक्ते, मनिषशेठ शहा, संतोष मुंदडा, संजय भट्टड, ललितकुमार धाडीवाल, सुनिलकुमार कोठारी, सुनिलकुमार गंगवाल, अखिलेश समदडीया, राजेंद्र सांगळे, तुषार सरोदे, संतोष धाडीवाल,प्रदिप कोल्हे, सनी भनसाळी, मोहसिन खान, पप्पुशेठ पवार, गनी हसन बागवान, भाऊसाहेब खैरनार, गणेश कोल्हे, व्दारकानाथ आरींगळे,दिलीप गंगवाल बाजार समितीचे सचिव श्री.नानासाहेब रणशुर, सहाय्यक सचिव श्री. बाळासाहेब टुपके व श्री.मनोज थोरात शेतकरी, कर्मचारी, हमाल मापाडी मोठया संख्येने उपस्थित होते.


सोबत – अटॅचमेंट मध्ये फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *