कोपरगावात संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे अभूतपूर्व जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा…

Uncategorized

शिवमहापुराण कथाकार प. पू. पंडित ललितजी नागर महाराज, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यासह हजारो शिवभक्तांची उपस्थिती…
कोपरगाव प्रतिनिधी:-आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळून निघालेला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर, रंगीबेरंगी फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी, सनई-चौघडे, तुतारीचा मंगलमय गजर, देशातील विविध पवित्र नद्यांच्या आणलेल्या पाण्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला १८ जोडप्यांच्या हस्ते विधिवत अभिषेक, ३५० शिवभक्त जोडप्यांच्या हस्ते मशालींसह महाआरती, ‘हर हर महादेव’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या गगनभेदी घोषणा, शिवछत्रपतींना मानवंदना देण्यासाठी जमलेली सर्वधर्मीय शिवभक्तांची अलोट गर्दी, पारंपरिक वेशभूषेतील मावळे, भगवे झेंडे फडकावत बेधुंद नृत्य करणारा तरुणवर्ग अशा चैतन्यदायी वातावरणात अभूतपूर्व जल्लोषात कोपरगाव येथे मंगळवारी ६ जून रोजी रात्री हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या सुंदर सोहळ्याचे आयोजन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. कोपरगाव शहर व तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असा भव्य दिव्य नेत्रदीपक शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला.


सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून मंगळवारी (६ जून २०२३) शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पवित्र नद्यांच्या पाण्याने अभिषेक, मशाल महाआरती आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात व आकाशात मुक्त उधळण करणाऱ्या रंगीबेरंगी फटाक्यांच्या आतषबाजीत रंगलेला हा नेत्रदीपक भव्य दिव्य सोहळा अविस्मरणीय ठरला.


या सोहळ्यास श्री चरित्र श्री शिवमहापुराण कथाकार प. पू. पंडित ललितजी नागर महाराज (सैंधवा, मध्य प्रदेश), कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, त्यांच्या सुविद्य पत्नी रेणुकाताई कोल्हे, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, मोनिकाताई संधान, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, विजय आढाव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भाजपचे न.प. तील माजी गटनेते रवींद्र पाठक, शिवसेना नेते कैलास जाधव, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, योगेश बागुल, स्वप्नील निखाडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, शिवसेनेचे (शिंदे गट) दत्ता पुंडे, महिला आघाडीप्रमुख विमलताई पुंडे, माजी नगरसेवक जनार्दन कदम, अशोक लकारे, जितेंद्र रणशूर, दिनेश कांबळे, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वैशालीताई आढाव, विद्याताई सोनवणे, हर्षाताई कांबळे, दीपाताई गिरमे, शिल्पाताई रोहमारे, विजया देवकर, नारायणशेठ अग्रवाल, प्रदीप नवले, कैलास खैरे, जयेश बडवे, रवींद्र रोहमारे, राजेंद्र बागुल, बाळासाहेब आढाव, गोपीनाथ गायकवाड, वैभव गिरमे, संदीप देवकर, दीपक जपे, बापू काकडे, सुशांत खैरे, सतीश रानोडे, गोपीनाथ गायकवाड, रंजन जाधव, संतोष गंगवाल, तुषार विद्वांस, प्रसाद आढाव, विक्रांत सोनवणे, किरण सुपेकर, शंकर बिऱ्हाडे, सर्जेराव टेके पाटील, राहुल सूर्यवंशी, सचिन सावंत, ज्ञानेश्वर गोसावी, गोरख देवडे, संजय खरोडे, सिन्नू भाटिया, कुणाल लोणारी, शुभम भावसार, निखिल जोशी, गौरीश लोहारीकर यांच्यासह भाजप, भाजयुमोचे आजी-माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक, शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘न भूतो न भविष्यती’ असा हा अभूतपूर्व सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी कोपरगाव शहर व तालुक्यातील शिवप्रेमी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. हातात भगवा झेंडा, डोक्यावर भगवी टोपी, कपाळाला अष्टगंध लावून हजारो शिवभक्त या सोहळ्यास उपस्थित होते. छत्रपती शिवरायांना मशालींसह महाआरती करून मानवंदना दिल्यानंतर युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान यांनी उपस्थित तरुणांसह शिवछत्रपतींचा महिमा सांगणाऱ्या गाण्यांवर बेधुंद नृत्य करत तरुणांचा उत्साह द्विगुणीत केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अठरापगड जातीच्या १८ जोडप्यांच्या हस्ते विधिवत जलअभिषेक करण्यात आला. जलअभिषेक करण्यासाठी अलकनंदा (बद्रीनाथ), धौलगंगा (विष्णू प्रयाग), भागीरथी (उत्तराखंड), गंगा, यमुना, सरस्वती (प्रयागराज, उत्तर प्रदेश), पंचगंगा (हरिद्वार, उत्तर प्रदेश), मंदाकिनी (केदारनाथ) व गोदावरी या पवित्र नद्यांचे पाणी आणण्यात आले होते. या जलकुंभाची पारंपरिक वाद्यांच्या निनादात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत व जलअभिषेक सोहळ्यात पारंपरिक वेशभूषेतील मावळ्यांसोबत प. पू. पंडित ललितजी नागर महाराज, माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रेणुकाताई कोल्हे, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, सौ. मोनिकाताई संधान आदींनी सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले.
जलअभिषेकानंतर ३५० शिवभक्त जोडप्यांच्या हस्ते मशाली प्रज्वलित करून महाआरती करून शिवरायांना मानवंदना देण्यात आली. यावेळी ‘हर हर महादेव’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या गगनभेदी घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी पंडित ललितजी नागर महाराज, स्नेहलताताई कोल्हे, विवेकभैय्या कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देत छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन त्यांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे मार्गक्रमण करावे, असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *