कोपरगांव ग्रामीण रुग्णालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्सवात साजरी…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगांव ग्रामीण रुग्णालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्सवात साजरी करण्यात आली .वैद्यकीय अधिक्षक डॉ सचिन यादव यांच्या मार्गदर्शना खाली डॉ कृष्णा फुलसुंदर डॉ संजय उंबरकर ,डॉ अमित नाईकवाड़े ,तौसीफ शेख ,अभिषेक सुरड़कर ,अनुराग पाटिल , परिचारक , परिचारिका तसेच इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ यादव म्हणाले की महामानव डॉ आंबेडकर हे आपल्या देशाला लाभलेले अमूल्य रत्न आहे. डॉ आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्य घटनेमुळे भारत जगातली सर्वात मोठी यशस्वी लोकशाही देश मानला जातो . बाबासाहेबांनी दिलेल्या समानतेच्या अधिकारामुळेच आज महिला सन्मानाचे जीवन मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *