सोमेश्वर महादेव देवस्थान वतीने पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा…

Uncategorized

श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे कोपरगाव तालुक्यातील महादेव देवस्थानात होळी उत्साहात…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान वतीने पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा करण्यात आला आहे.
प्रारंभी सोमेश्वर महादेव, गणपती, गंगामाता,नंदी पुजन करण्यात आले.सोमेश्वर महादेव देवस्थान समोरील प्रांगणात सडा,रांगोळी करुन उस,गोवरीने,फुलांची सजावट करुन पारंपरिक पद्धतीने पर्यावरणपूरक होळी सजविण्यात आली. मंत्रोच्चार आणि विधवत पुजन करत सनई चौघड्यांचे निनादात होळीचे दहन करण्यात आले.
श्रीमंत पवार सरकार संस्थानचे महादेव देवस्थान बेट कोपरगाव, गंगेश्वर महादेव देवस्थान, जेऊर कुंभारी येथेही होळी उत्सव साजरा करण्यात आला.


या प्रसंगी सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख श्री. महेंद्रजी(बाळासाहेब) पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुशांतजी घोडके, सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोदजी नरोडे,सोमेश्वर महादेव भक्त मंडळाचे श्री. मनोजजी कपोते, श्री.संतोषजी देवळालीकर,श्री.सतिषजी लोढा, श्री.ज्ञानेशजी कपिले,श्री.नंदूजी जाधव,श्री.संदिप आहेरराव,श्री.नंदनजी घाडगे, पौरोहित्य श्री. प्रदिपशास्री पदे, श्री. नंदूजी शेंडे(गुरव), महादेव देवस्थान बेटचे व्यवस्थापक अॅड.शामजी मुंदडा, श्री.मच्छिंद्रजी सोनवणे,श्री.कैलासराव आव्हाड, श्री.विजयजी वाघमारे(गुरव),गंगेश्र्वर महादेव देवस्थानचे श्री. पाटीलबा वक्ते,श्री.विश्वजितजी वक्ते, श्री.ओमजी वक्ते यांचे सह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.
जय सोमेश्वर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *