
भारताचे महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मु यांचे हस्ते रोहत येथे शिबिराचे उद्घाटन…
कोपरगाव प्रतिनिधी:- भारत स्काऊट गाईड चे १८ वे महाशिबीर राजस्थान येथील रोहत जिल्हा पाली येथे नुकतेच महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे उपस्थितीत पार पडले सहा दिवस चाललेल्या या कार्यक्रमात जगभरातील सुमारे ३८२४१ स्काऊट यांनी या दैदिप्यमान सोहळ्यात सहभाग घेतला होता
वारी येथील सोमैय्या विद्यामंदिर साकरवाडी या शाळेचा विध्यार्थी आदर्श स्काऊट उपसंघनायक आदित्य अनिलकुमार सिंग याची राष्ट्रपती महोदयांना मानवंदना देण्यासाठी निवड झाली होती संचालन करणाऱ्या सर्वांनी राष्ट्रपती महोदयांचे अभिवादन केले भारतासह बांगलादेश श्रीलंका, यु यस इ, नेपाळ, घाना,मलेशिया, मालदीव आदी देशातील स्काऊट या सोहळ्यात सहभागी झाले होते
प्रभात फेरीत सादरीकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्यासाठी सोमय्या विद्यामंदीर साकरवाडीच्या विद्यार्थ्यांची निवड झाली होती या विद्यार्थ्यांना स्काऊट मास्टर जिल्हा समुपदेशक संजय गडकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी झालेल्या प्रभात फेरीत महाराष्ट्राची संस्कृती आध्यात्मिक वारसा त्यांनी दर्शविला संपूर्ण जयपूर शहरात वारकरी संप्रदायाचे दिंडीचे प्रदर्शन हरिनामाचा गजर केल्याने आकर्षण ठरले व सर्वांचे लक्ष वेधले
सांस्कृतिक कार्यक्रमात भारूड व कलागुण सादर करून उपस्थितांना मंत्र मुद्ध केले तसेच महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीची जगाला ओळख करून देतांना फुड प्लाझा या स्पर्धेत सकरवाडी चा स्काऊट शुभम तायडे याने नानाविध पदार्थ बनवुन कौशल्य सिद्ध केले


शिबिरात हवाई दलाच्या मनमोहक सूर्या किरण प्रदर्शनाने उपस्थितांचे पारणे फेडले
साकरवाडीच्या स्काऊटसनी मंकी ब्रिज, माउंटनिंग,एअर सायकलिंग, कमांडो ब्रिज,टायर वॉल आशा साहसी खेळात सहभाग नोंदवला
शिबिरात संघनायक आदित्य मगर, उपसंघनायक आदित्य अनिलकुमार सिंग,स्काऊट अमित झालटे,शुभम तायडे, जय ठोंबरे,यश विसपुते, साई लोखंडे ,आदित्य भुजंग,संतोष निकम या आदर्श स्काऊट नी सहभाग घेऊन वेगळेपण सिद्ध करून भरीव कामगीरी केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
विध्यार्थ्यांना घडविण्यासाठी मुख्याध्यापिका एस व्ही पारे मॅडम, बी टी खळदकर,उत्तम बर्डे,श्रीमती भारती वक्ते,सोनाली निकम,सागर भगत,सोपान शिरसाट ,संजय राऊत सर यांचे तसेच राज्य चिटणीस एन बी मोटे ,अरुण सपकाळे शिक्षणाधिकारी बी जे पाटील अशोक कडुस, जी जे भोर,एस एन तेलंगे,भाऊसाहेब ठाणगे तालुका गटशिक्षणाधिकारी शबाना शेख,संगीता लांडगे द्वारका वाळे,काशिनाथ बुचुडे,म्हस्के सर, पगारे सर,संजय मोरे,जाधव, विनया राजगुरू गायकवाड,गाईड कॅप्टन अनिता शिंदे, सुरडकर अहमदनगर जिल्ह्यातील स्काऊट मास्टर व गाईड कॅप्टन आदींचे विशेष मार्गदर्शन लाभले
शिबिरात यशस्वीपणे सहभाग व उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल सोमैय्या उद्योग समुहाचे सर्वेसर्वा समिरशेठ सोमय्या, गोदावरी बायो रिफायणारीजचे डायरेक्टर सुहास गोडगे,लेफ्टनंट जनरल जगबिरसिंग ,वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिशभाऊ कानडे,बी एम पालवे,दिनेशजी गुप्ता, सौदागर कुलाल,डॉ हेमा भडावकर,उर्मी ठक्कर,परवीन शेख,अश्विनी शेळके प्राचार्या पारे मॅडम आणि सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे
