कोपरगांव प्रतिनिधी:- इंटर इंजिनिअरींग डीप्लोमा स्टूडंटस् स्पोर्टस असोसिएशन (आयईडीएसएसए), महाराष्ट्र राज्य प्रायोजीत ई झोनच्या वेट लिफ्टिंग स्पर्धांमध्ये ५५ किलो वजन गटाअंतर्गत संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या दिलशाद खान याने प्रथम क्रमांक पटकाविला तर ६१ किलो वजन गटाअंतर्गत मोहम्मद फैजानराजा याने द्वीतिय क्रमांक मिळविला. तसेच कुस्तीच्या स्पर्धेमध्ये ओम जालिंदर आढाव याने ७१ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवुन कुस्तीचे मैदान गाजविले. परीक्रमा पाॅलीटेक्निक, काष्टी येथे झालेल्या स्पर्धांमध्ये संजीवनीच्या खेळाडूंचाच बोलबाला होता, अशी माहिती संजीवनी पाॅलीटेक्निकच्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की वेटलिफ्टिंग व कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या खेेळाडूंची आता शासकीय तंत्रनिकेतन, कराड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड झाली असुन तेथेही जिंकण्याच्या इर्षेने सध्या ते सराव करीत आहेत. ई झोन अंतर्गत वेटलिफ्टिींग स्पर्धेत पाॅलीटेक्निक व डी. फार्मसी संस्थांमधुन एकुण १९ संस्थांच्या ६३ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. सर्व साधारणपणे अभियांत्रिकी सारखे व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था खेळाकडे लक्ष देत नाही अशी धारणा असते. परंतु अभ्यासाइतकेच सर्वांगीण विकासाठी खेळही महत्वाचे असतात, म्हणुन संजीवनी पाॅलीटेक्निक कडून विध्यार्थ्यांना प्रोत्साहीत केल्या जाते. विध्यार्थ्यांना प्रत्येक खेळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय निपुणताप्राप्त कोचेसची निवड करण्यात आली आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा सत्कार करून राज्यस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, सर्व विभाग प्रमुख व क्रीडा प्रशिक्षक श्री शिवराज पाळणे उपस्थित होते.

फोटो ओळी:- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांचे समवेत विभागीय पातळीवरील विजेते व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू, प्राचार्य व विभाग प्रमुख.
