

कोपरगाव प्रतिनिधी:-
सर्वसामान्य नागरिक न्यायापासून वंचित राहू नये म्हणून शासन स्तरावर प्रयत्न केले जात असून जनतेने त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश श्री शिलार साहेब यांनी केले
तालुका विधी सेवा समिती व कोपरगाव जिल्हा न्यायालयाच्या वतीने येसगाव येथे कायदे विषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील अशोक वहाडने यांनी केले तर सूत्र संचालन अँड.यु एन पाईक यांनी केले तसेच आभार अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले
या वेळी अँड.एस. एस धोर्डे,अँड.बी एन गंगावणे विविध कायदे व त्यातील तरतुदींची माहिती दिली
कार्यक्रमास अँड.अतिष आगवन येस गाव येथील सरपंच पुंडलिक गांगुर्डे,संदीप गायकवाड, खिर्डी गणेश सरपंच सरलाताई चांदर अमोल झावरे पोलीस पाटील बाबासाहेब गायकवाड, बापूसाहेब सुरळकर, ग्राम विकास अधिकारी डी बी गायकवाड, ग्रामसेवक बागुल,खिर्डी गणेश ग्रामसेविका शेलार मॅडम,अंगणवाडी सेविका,आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
