कोपरगाव तालुक्यातील टाकळी या गावात दि.१५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री बिबट्या ने शेळीवर हल्ला…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
कोपरगाव तालुक्यातील टाकळी या गावात दि.१५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री बिबट्या ने शेळीवर हल्ला केला टाकळी येथील रवींद्र(गुरु) साहेबराव देवकर यांच्या शेळी पालन गोठ्यात दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री बिबट्याने एक मोठी शेळी मारली यावेळी वन विभागाचे कर्मचारी एस एस गोसावी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला समवेत मा सभापती सुनील भाऊ देवकर रवींद्र(गुरु) देवकर
मा सभापतीं सुनील भाऊ देवकर यांनी फोनवर प्रतिभाताई पाटील वन विभागाचे तालुका अधिकारी यांच्याशी संपर्क साधून टाकळी गावातील ही नववी ते दहावी घटना आहे तरीही बिबट्याचा बंदोबस्त करता येत नाही आपण लक्ष घालून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी देखील विनंती केली आणि या टाकळी गावातील नऊ ते दहा शेतकऱ्यांचे दहा ते पंधरा हजाराच्या पुढे नुकसान या बिबट्याने केले तिचे देखील शासना कडुन भरपाई मिळावी त्याचप्रमाणे बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अन्यथा आम्हाला लोकशाहीच्या मार्गाने उपोषणास बसावं लागेल की काय असेही मत व्यक्त केले एक पिंजऱ्याने काही होत नाही बिबट्याचा वावर तो दुसरीकडे पिंजरा तिसरीकडे लावला जातो हे देखील गोसावी साहेबांच्या लक्षात मा सभापतींनी आणून दिलं तर त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आपणाकडे आम्ही मागणी करत आहोत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *