कोल्हे गटाचे भानुदास वक्ते राष्ट्रवादीत…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील कोल्हे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते भानुदास वक्ते यांनी नामदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी बिनविरोध झाल्याबद्दल जेऊर कुंभारी येथील कार्यकर्त्यांनी ना. आशुतोष काळे यांचा नुकताच कारखाना कार्यस्थळावर सत्कार केला. यावेळी त्यांच्या समवेत आलेल्या कोल्हे गटाचे कार्यकर्ते भानुदास वक्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली.त्यावेळी ना.आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी भानुदास वक्ते म्हणाले की, ना. आशुतोष काळे यांनी अडीच वर्षात मतदार संघाचा विकासाच्या बाबतीत कायापालट करून जनसामान्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. समर्थपणे कारखान्याची जबाबदारी सांभाळत असताना आदर्श कारभार करून सभासदांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा असून माझ्याप्रमाणेच अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दिलीपराव शिंदे, रामनाथ आव्हाड, बाबाजी वक्ते, कल्याणराव गुरसळ, बापूसाहेब वक्ते, महेंद्र वक्ते, संजय चव्हाण, शिवाजी वक्ते, भाऊसाहेब वक्ते, गोरख चव्हाण, केशवराव आबनावे, तुषार गुरसळ, भानुदास वक्ते, किशोर वक्ते, भगीरथ पगारे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *