श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात भगवान महावीर यांची जयंती तसेच भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती सोहळा उत्साहाने संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत १४ एप्रिल २०२२ सत्य व अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती उत्साहाने संपन्न झाली.
श्री.गो.विदयालयात डाॕ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पुजन कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिलीपकुमार अजमेरे यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी विदयालयाचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, कोपरगांव एज्युकेशन सोसा.अध्यक्ष कैलास ठोळे,सहसचिव सचिन अजमेरे,डाॕ.अमोल अजमेरे,संदीप अजमेरे आदिनी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांना अभिवादन केले.
विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.भगवान महावीर यांचा सत्य व अहिंसेचा संदेश सर्वाना मार्गदर्शक असुन डाॕ.बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार तर होतेच पण त्याच बरोबर त्यांनी कामगांराचे कायदे व त्यांचे अधिकार यामध्ये खुप मोलाचे योगदान आहे असे स्पष्ट केले.
या वेळी विदयालयाचे विदयार्थी कु. निदा मन्सुरी,मुबतशिर मन्सुरी,कु.आरती म्हस्के,रिध्दी चव्हाण,आरती चव्हाण यांनी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवना विषयी माहीती स्पष्ट केली तर सार्थक वाघ याने भगवान महावीर यांचे विचार स्पष्ट केले.
विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक एस.डी.गोरे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.उपमुख्याध्यापक गायकवाड आर.बी.यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षक डी.व्ही.तुपसैंदर,यु.एस.रायतेताई,बी.सी.उल्हारे,बी.बी.कुळधरण,ऐ.बी.अमृतकर,डी.पी.कुडके,जाधव ई.एल,ए.जे.कोताडे,एस.एन. शिरसाळे,वाय.के.गवळे आदी शिक्षक,शिक्षिका,विद्यार्थी बहुसंख्यने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *