
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव वकील संघात नव्याने आलेल्या वकिलांना ऑफिस करिता पुरेशी जागा नाही त्यामुळे आ आशुतोष काळे यांनी वकिलांच्या चेंबर साठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कोपरगाव वकील संघाचे सदस्य व लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका निवेदनाद्वारे आ आशुतोष काळे यांना केली
कोपरगाव न्यायालयीन इमारती साठी आ आशुतोष काळे यांनी ३८ कोटी रुपये मंजूर करून दिल्या बद्दल वकील संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वकील संघाचे अध्यक्ष अँड.विद्यासागर शिंदे होते
यावेळी वकील संघाचे सदस्य अँड.नितीन पोळ यांनी आ आशुतोष काळे यांना ज्युनियर वकिलांच्या समस्या मांडताना सांगितले की कोपरगाव वकील संघात सद्या २५० वकील असून सुमारे २५ -३० वर्षांपूर्वी वकिलांचे चेंबर बांधण्यात आले मात्र बरेच वकील ग्रामीण भागातून आले असून त्यांना कोर्ट परिसरात ऑफिस नाहीत कोर्टाच्या शेजारी पोलीस वसाहती मधील जागा पूर्वी पोलीस उपअधीक्षक कार्यालयासाठी वर्ग करण्यात आली होती मात्र सुमारे दहा वर्षांपूर्वी शिर्डी येथे पोलीस अधीक्षक कार्यालय मंजूर झाले असून शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस उपअधीक्षक कार्यालय सुरू आहे मात्र कोपरगाव कोर्टाशेजारी असलेली जागा अद्याप पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या नियोजित जागेसाठी वर्ग केलेली असून ती तशीच पडून आहे त्या ठिकाणी पोलिसांनी अपघातात व गुन्ह्यात जप्त केल्या जुन्या पडून आहेत ही जागा वकिलांच्या चेंबर करिता उपलब्ध करून द्यावी म्हणून जून 2019 मध्ये वकील संघाने तसा ठराव करून रीतसर मागणी देखील केली आहे
ही जागा नवीन वकिलांना ऑफिस करिता उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागातून येणाऱ्या व नवीन वकिलांची अडचण दूर होईल अशी मागणी केली असून आ आशुतोष काळे यांनी लवकरच या जागेबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करू असे सांगितले या मागणी मुळे अनेक ज्युनियर वकिलांच्या ऑफिसची समस्या सुटणार असल्याने ज्युनियर वकिलांनी समाधान व्यक्त केले
