
कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील कासली येथील सौ. मंदाबाई रावसाहेब जाधव (५८) यांचे निधन झाले त्यांच्या मागे पती, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कासली सहकारी सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब त्रंबक जाधव यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी शोक व्यक्त केला.
