स्नेहलता कोल्हेंचे कोपरगांवच्या स्थानिक दिवाळी खरेदीला महत्व..!

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:- जनता पक्षाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगांवच्या स्थानिक बाजारपेठेतुनच दिवाळी खरेदीला महत्व देत सोमवारच्या आठवडे बजाराचा मुहूर्त साधत त्यांनी ही खरेदी केली आहे. छोटया मोठया व्यापा-यांशी त्यांनी संवाद साधत त्यांची आस्थेने विचारपूसही केली.
सौ. स्नेहलता कोल्हे यांनी काही दिवसापुर्वीच कोपरगांव विधानसभा मतदार संघातील नागरिकांना दिवाळीची खरेदी स्थानिक बाजारपेठेतुनच करावी असे आवाहन केले होते. त्यांनी स्वतःच हा नियम कटाक्षाने पाळला आहे. ऑनलाईन खरेदीतुन अनेकांची मोठया प्रमाणात फसवणुक झालेली आहे. कोरोना महामारीमुळे आर्थीक घडी पुर्णपणे विस्कटलेली असुन ती हळुहळु उभारी घेत आहे, मतदार संघातील असंख्य गोर-गरीब, निराधार, मध्यमवर्गीय आदि ज्ञात अज्ञात बांधव कोरोना संकटाला बळी पडले त्यांच्या कुटूंबियांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी संजीवनी उद्योग समुह व संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमांतुन मदतीचा हात दिला आहे. शेतकरी वर्गाचीही पावसामुळे खरीप पिकांची नासाडी झाली त्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे त्यामुळे दिवाळी कशी साजरी करावयाची हा त्यांच्यापुढे प्रश्न होता त्यासाठी पिकविम्याची रक्कम तात्काळ मिळावी म्हणून शासनांकडे मागणी केली होती तर अतिवृष्टीग्रस्तांचे थकीत अनुदानही संबंधीतांच्या बँक खात्यावर वर्ग व्हावे म्हणून विनंती केली होती. आज छोटयातला छोटा घटकही आर्थीक विवंचनेत आहे त्यामुळे अनेकांनी दिवाळसणानिमीत्त व्यवसायाच्या दिशा बदलल्या. कोपरगांवची बाजारपेठ सजली आहे आपण आपल्याच बांधवाकडुन दिवाळीची खरेदी केली तर स्थानिकांनाच त्याचा जास्त प्रमाणात फायदा होणार आहे. घरगुती प्रापंचिक वस्तु, आकर्षक पणत्या, लक्ष्मी मुर्त्या, करदोरे, लाहयाबत्ताशे, बालगोपालांसाठी कपडे, रंगी बेरंगी रांगोळया, महिलाबचतगटांनी तयार केलेला दिवाळी फराळ, आकाशकंदिल, विद्युत रोषणाईची साधने, ज्येष्ठांसाठी गरजेच्या वस्तु, फुले-हार-गजरे, नाविन्यपुर्ण दुचाकी चारचाकी वाहने, शाळा महाविद्यालयीन मुले मुलींसाठीच्या निकडीची वहया, पुस्तके, संगणके इत्यादी वस्तुंनी कोपरगांवची दिवाळीची बाजारपेठ सजली आहे तेंव्हा सर्वांनी स्थानिक खरेदीला प्राधान्य द्यावे असे आवाहनही सौ. कोल्हे यांनी शेवटी केले आहे.

फोटोओळी:- कोपरगांव- भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगांवच्या स्थानिक बाजारपेठेतुनच दिवाळी खरेदीला महत्व देत सोमवारच्या आठवडे बजाराचा मुहूर्त साधत त्यांनी ही खरेदी केली व छोटया मोठया व्यापा-यांशी त्यांनी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *